कोलंबो : सलामीवीर धनुष्का गुणतिलका याच्यावर श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) शुक्रवारी सहा सामन्यांची बंदी घातली. हॉटेलमधील गुणतिलकाच्या खोलीत नॉर्वेच्या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप असून पोलीस चौकशी करीत आहेत. २७ वर्षाच्या या खेळाडूची पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली. गुणतिलकाच्या खोलीतच नॉर्वेच्या दोन महिलांपैकी एकीवर त्याचा मित्र संदीप ज्यूड सेलिहा याने बलात्कार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लंकेने द. आफ्रिका संघावर मिळविलेल्या कसोटी विजयाच्या दिवशी पहाटे ही घटना घडल्याचे कळते.गुणतिलकावर आरोप नसला तरी एसएलसीच्या खेळाडू आचारसंहितेअंतर्गत चौकशी पूर्ण होईस्तोवर त्याला निलंबित ठेवण्यात आले आहे. नियमानुसार सामन्यादरम्यान खेळाडूने स्वत:च्या खोलीत रहावे आणि कुठल्याही पाहुण्यांना पाचारण करू नये. गुणतिलकाने याच अटीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आधीच संघाबाहेर काढण्यात आलेला हा फलंदाज आता पाच वन-डे आणि एक टी-२० आंतरराष्टÑीय सामना खेळू शकणार नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- श्रीलंकेच्या गुणतिलकावर सहा सामन्यांची बंदी
श्रीलंकेच्या गुणतिलकावर सहा सामन्यांची बंदी
हॉटेलमधील गुणतिलकाच्या खोलीत नॉर्वेच्या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:44 AM