श्रीलंकेला आता चमत्काराची आस

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात आणखी एक मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताने पुन्हा एकदा सहाशे पार मजल मारली असून दुस-या दिवसअखेर यजमान श्रीलंका संघ अडचणीत सापडला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:56 AM2017-08-05T00:56:33+5:302017-08-05T00:56:37+5:30

whatsapp join usJoin us
 Sri Lankan now has miracles | श्रीलंकेला आता चमत्काराची आस

श्रीलंकेला आता चमत्काराची आस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सुनील गावस्कर लिहितात...
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात आणखी एक मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताने पुन्हा एकदा सहाशे पार मजल मारली असून दुस-या दिवसअखेर यजमान श्रीलंका संघ अडचणीत सापडला आहे. झपाट्याने वळणाºया चेंडूला उसळीही मिळत आहे. त्यामुळे श्रीलंकेला या संकटातून मार्ग काढण्यासाठी चमत्काराची आशा आहे.
पहिल्या दिवशी खेळपट्टी एका टोकाकडून संथ होती तर दुसºया टोकाकडून फिरकीला अनुकूल होती. भारतीय फलंदाजांनी याचा लाभ घेतला. पुजाराने कारकिर्दीतील ५० व्या कसोटी सामन्याचा आनंद शतकी खेळी करून साजरा केला. अजिंक्य रहाणेनेही शतक साकारले. भारताने पहिल्या दिवशी जवळजवळ साडेतीनशे धावा फटकावल्या. दुसºया दिवशी पहिल्याच सत्रात दोघेही शतकवीर फलंदाज झटपट बाद झाले. श्रीलंकेच्या गोलंदाजांना मात्र केलेल्या चुकांपासून बोध घेता आला नाही.
रविचंद्रन अश्विनने मात्र खेळपट्टीवर आवश्यक असलेला टप्पा व वेग राखत मारा केला. भारताने मोठी धावसंख्या उभारली असल्यामुळे दिवसअखेर अश्विनच्या गोलंदाजीवर धावा फटकावल्या गेल्या असल्या तरी चिंतेची बाब नाही. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलने संयमी खेळी करीत आपला निर्धार स्पष्ट केला. नजिकच्या क्षेत्ररक्षकांच्या जाळ्यापासून स्वत:चा बचाव करण्यात कितपत यशस्वी ठरतो, हा प्रश्न आहे. तो खेळपट्टीवर किती वेळ राहतो, यावर श्रीलंकेचा डाव अवलंबून आहे. जर श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुजारा-रहाणे जोडीकडून काही बोध घेतला तर भारतीय फिरकीपटूंपुढे काही अंशी आव्हान निर्माण करू शकतात. जर श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय खेळाडूंप्रमाणे फूटवर्कचा योग्य वापर केला तर त्यांना धावफलक हलता ठेवण्यास मदत मिळेल आणि त्यामुळे मोठ्या लक्ष्याचे दडपणही कमी होण्यास मदत होईल. आखूड टप्प्याचा चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा वसूल करण्यात यश मिळू शकते. हे सांगण्यास सोपे असले तरी अशी कामगिरी करण्यासाठी यजमान संघाच्या फलंदाजांना सकारात्मक होऊन फलंदाजी करावी लागेल. (पीएमजी)

Web Title:  Sri Lankan now has miracles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.