कराची : पाकिस्तानमध्ये तब्बल तीन दिवस हॉटेलमध्ये बंदिस्त राहण्याची पाळी श्रीलंकेच्या संघावर आल्याचे वृत्त आहे. याबाबतचा खुलासा श्रीलंकेच्या सुरक्षेचे मुख्य अधिकारी शामी सिल्व्हा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तीन दिवस श्रीलंकेच्या संघाचा हॉटेलमध्ये श्वास गुदमरला होता, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीलंकेचा संघ पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 सामने खेळला आहे. या सामन्यांच्यावेळी पाकिस्तामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. सिल्व्हा हे पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघबरोबर होते. पण काही दिवसांपूर्वी ते श्रीलंकेत परतले आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या क्रिकेट मंडळाला सांगितली आहे.
याबाबत सिल्व्हा म्हणाले की, " तीन दिवस श्रीलंकेचा संघ हॉटेलमध्ये बंदिस्त अवस्थेत होता. खेळाडूंना सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलमधील रुम्सच्या बाहेरही येऊ दिले जात नव्हते. माझ्यामध्ये ही गोष्ट फारच निराशाजनक होती."
पाक मंडळाची श्रीलंकेकडे अजब मागणी, कसोटी मालिका खेळायचीय तर खर्च उचला
श्रीलंका क्रिकेट संघानं नुकतीच पाकिस्तानात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळली. 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने झाले नव्हते. एक दोन सामने वगळता, पाकिस्तानात मोठा संघ येण्याची ही पहिलीच वेळ होती. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळवण्यास उत्सुक आहे. पाकिस्ताननं कसोटी मालिकेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पण, त्याचवेळी श्रीलंकेला ही कसोटी मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळायची असल्यास त्यांनी खर्च उचलावा, अशी अजब मागणी पीसीबीनं केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील कसोटी मालिकेचा खर्च उचलण्यास पीसीबी तयार नाही. पीसीबीचे म्हणणे आहे की,''श्रीलंकेचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येण्यास उत्सुक नसेल आणि ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे व्हावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी पीसीबीसोबत मिळून मालिकेचा खर्च उचलावा.''
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेने डिसेंबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर यावे, अशी पीसीबीची इच्छा आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीसाठी दुबईत आले होते. तेव्हा त्यांनी श्रीलंकेच्या प्रतिनिधिंशी कसोटी मालिकेबाबत चर्चा केली. ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळवायची झाल्यास, त्यांनी खर्च उचलावा असेही पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या प्रतिनिधिंना सांगितले.
Web Title: The Sri Lankan team was locked up in a hotel for three days in Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.