गॉल : श्रीलंकेचा लाहिरू थिरिमानेने आठ वर्षांत प्रथमच झळकावलेल्या कसोटी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ३५९ धावांची मजल मारली आणि इंग्लंडपुढे विजयासाठी ७४ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिवसअखेर इंग्लंडने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३८ धावा केल्या होत्या. आजचा खेळ थांबला त्यावेळी जॉनी बेयरस्टो (११) आणि डॅन लॉरेन्स (७) खेळपट्टीवर होते.
इंग्लंडने पहिल्याच षटकात सलामीवीर फलंदाज डॉम सिबले (२) याला गमावले. त्यानंतर दुसरा सलामीवीर फलंदाज जॅका क्राले (८) स्वस्तात बाद झाला. दोन्ही बळी लसिथ एम्बुलडेनिया (२-१३) याने घेतेले. पहिल्या डावात दि्वशतकी खेळी करणारा जो रुट (१) धावबाद झाला. त्याआधी, श्रीलंकेचा दुसरा डाव चहापानानंतर ३५९ धावांत संपुष्टात आला. त्यात तिरिमानेच्या (१११) शतकी खेळीव्यतिरिक्त अनुभवी ॲन्जेलो मॅथ्यूज (७१) याने अर्धशतक झळकावले. सलामीवीर फलंदाज कुसल परेरा (६२) याचे योगदानही उल्लेखनीय ठरले.
संक्षिप्त धावफलक -
श्रीलंका : पहिला डाव ४६.१ षटकांत सर्वबाद १३५. दुसरा डाव १३६.५ षटकांत सर्वबाद ३५९ (लाहिरू थिरिमाने १११, मॅथ्यूज ७१, कुसल परेरा ६२, कुसल मेंडिस १५, लीच ५-१२२, बेस ३-१००, कुरेन २-३७).
इंग्लंड : पहिला डाव ११७.१ षटकांत सर्वबाद ४२१. दुसरा डाव १५ षटकांत ३ बाद ३८ (जॉनी बेयरस्टो खेळत आहे ११, डॅनियल लॉरेस्ट खेळत आहे ७, एम्बुलडेनिया २-१३)
Web Title: Sri Lanka's 74-run target Johnny Bairstow and Dan Lawrence on the field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.