नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. दिल्लीतील प्रदूषणावरून एकीकडे राजकीय लढाई सुरू असतानाच भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटीतही धुरक्यामुळे अडथळा आला. एकीकडे विराट कोहली पाहुण्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मैदानात आलेल्या धुरक्याचे निमित्त करून रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली. मास्क घालून क्षेत्ररक्षण करत असलेल्या लंकन खेळाडूंनी धुरक्याचा त्रास होत असल्याचे सांगत वारंवार खेळात अडथळा आणला. मात्र पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला असता डॉक्टरांनी खेळ सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही श्रीलंकेने रडारड सुरू ठेवली. लहिरू गमागे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निमित्त करून मैदानाबाहेर गेला. लंकेच्या या डावामुळे भारतीय फलंदाजीची लय बिघडली. अखेर वैतागलेल्या विराट कोहलीने डाव घोषित करून श्रीलंकन संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. उपाहारापर्यंत मैदावाती परिस्थिती सामान्य होती. मात्र उपाहारानंतर विराट कोहली त्रिशतकी मजल मारणार अशी अपेक्षा होती. मात्र ऐन मध्यान्ही मैदानात आलेले धुरके आणि त्याचे निमित्त करून श्रीलंकन खेळाडूंनी खेळास चालढकल करण्यास केलेली सुरुवात यामुळे विराटची लय बिघडली. त्यातच अश्विन आणि विराट (243) पाठोपाठ बाद झाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- धुरक्याच्या निमित्ताने श्रीलंकेचा रडीचा डाव, वैतागलेल्या विराटने घोषित केला डाव
धुरक्याच्या निमित्ताने श्रीलंकेचा रडीचा डाव, वैतागलेल्या विराटने घोषित केला डाव
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीती प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. दिल्लीतील प्रदूषणावरून एकीकडे राजकीय लढाई सुरू असतानाच भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटीतही धुरक्यामुळे अडथळा आला.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 3:09 PM