Join us  

विराट कोहली नाबाद 156, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 371 धावा

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 9:25 AM

Open in App

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवले. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद (156) धावा आणि सलामीवीर मुरली विजयच्या (155) धावा या दोघांच्या दीडशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारताच्या चार बाद 371 धावा झाल्या आहेत. 

दोघांन तिस-या विकेटसाठी 283 धावांची भागीदारी केली. विराट आणि विजयने मैदानावर चौफेर फटकेबाजी करुन श्रीलंकन गोलंदाजांना अक्षरक्ष कुटुन काढलं. दिवसातली अखेरची काही षटक बाकी असताना मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे लागोपाठ बाद झाल्यामुळे भारताच्या सुंदर इनिंगला काहीस गालबोट लागलं. विजय आणि रहाणे एकाच पद्धतीने बाद झाले. दोघांनाही संदाकनने डिकवेलाकरवी यष्टीचीत केले. रहाणे अवघी (1) धावा काढून बाद झाला. सलामीवीर शिखर धवन (23) आणि चेतेश्वर पूजारा (23) धावांवर बाद झाले. परेरा आणि गामागेने प्रत्येकी एक विकेट घेतला. 

मुरली विजयने कसोटी क्रिकेटमधील 11 वे आणि विराट कोहलीने 20 वे शतक साजरे केले. विराटने आजच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमधला 5 हजार धावांचा टप्पाही गाठला. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा केल्या आहेत.सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतकांची हॅटट्रीक करणारा विराट पहिला कॅप्टन ठरला आहे.

विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. दरम्यान, तिसऱ्या आणि निर्णयाक लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नागपूर कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि के. एल राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी मोहम्मद शामी आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालं आहे. घरगुती कारणामुळे दुसऱ्या कसोटीतून शिखर धवन याने माघार घेतली होती.

दरम्यान, विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत. 

नागपुरात दुस-या कसोटीत एक डाव २३९ धावांनी विजय मिळवित भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. याआधी ओळीने आठ मालिका जिंकण्याची कामगिरी विराटच्या संघाने केली. कोटलावर सामना बरोबरीत राहिला तरीही सलग नऊ सामने जिंकण्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी भारत बरोबरी करेल. भारताने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका गमविली होती. तेव्हापासून भारताने नऊ मालिका खेळल्या व सलग आठ जिंकल्या. मायदेशात पाच तसेच श्रीलंकेत दोन व वेस्ट इंडिजमध्ये एक मालिका विजय साजरा केला. भारताने मागील २३ पैकी तब्बल १९ कसोटी सामने जिंकले. एकमेव सामना गमावला तो आॅस्ट्रेलियाविरुद्ध. द. आफ्रिका दौºयापूर्वी हा अखेरचा कसोटी सामना असेल्याने कोहलीच्या इच्छेनुसार कोटलाची खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यात येत आहे.

 

टॅग्स :क्रिकेटक्रीडाभारतीय क्रिकेट संघविराट कोहली