कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाला एका गोलंदाजाने बुचकळ्यात टाकले आहे. पाच वन डे, एक ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. वन डे मालिकेला 10 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघाने येथे सराव सामना खेळला आणि जिंकलाही. मात्र, या सामन्यात एका फिरकी गोलंदाजाने पाहुण्या फलंदाजांना आश्चर्यचकित केले.
कमिंडू मेंडिस असे या गोलंदाजाचे नाव आहे. श्रीलंका क्रिकेट एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा 20 वर्षीय गोलंदाज ऑफ स्पीनर आहे. त्याच्या गोलंदाजीची विशेष बाब म्हणजे तो दोन्ही हाताने गोलंदाजी करतो आणि त्यामुळेच तो चर्चेचा विषय बनला आहे. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 षटकांत 37 धावा दिल्या. त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली नसली तरी त्याच्या दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याच्या शैलीने इंग्लंडचे फलंदाज चक्रावले आहेत.
Web Title: This srilankan cricketer can bowl with both arms
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.