व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवानंतर हैदराबादच्या खेळाडूंचे मनोधैर्य ढासळणे अपेक्षित होते, पण संघाने सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध केलेली कामगिरी सुखावणारी होती. जयपूरमध्ये आम्ही १७५ धावांच्या आसपासच्या मजल मारण्याच्या दिशेने वाटचाल करीत होतो, पण आमची घसरगुंडी उडल्यामुळे त्यात १५ धावा कमी पडल्या. राजस्थानने हे लक्ष्य सहज गाठले. हैदराबादमध्ये आम्हाला वर्चस्व गाजवण्याची संधी होती.
ही आमच्यासाठी महत्त्वाची लढत होती, त्यामुळे चांगली सुरुवात होणे आवश्यक होते. डेव्हिड वॉर्नर व रिद्धिमान साहा यांनी तेच केले. साहाचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश असो किंवा नसो, पण तो कसून मेहनत घेत असतो. तो युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहे. राखीव खेळाडूंमध्ये बराच वेळ घालविल्यानंतर त्याने संधी मिळताच धावा काढल्या.
डेव्हिड वॉर्नरबाबत काय बोलू? गेले वर्ष त्याच्यासाठी समस्यांचे होते. त्यात कोपराच्या दुखापतीची भर पडली. मोसमाच्या सुरुवातीला आम्ही त्याच्याबाबत विशेष आशावादी नव्हतो, तो खरच लढवय्या आहे. तो १२ सामन्यांसाठी उपलब्ध राहील, याची आम्हाला कल्पना होती.
वॉर्नरने प्रशिक्षक टॉम मुडी यांना यंदा ५०० धावा फटकावण्याचे वचन दिले. त्याने लक्ष्य निश्चित केले होते व त्याने ज्या निर्धाराने ते गाठले शानदार होते. त्याने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ६९२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आमचा संघ प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर आहे. वॉर्नर मानसिकदृष्ट्या कणखर असून त्याची पत्नी कॅन्डिस त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
Web Title: Star batsman David Warner is mentally strong!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.