duleep trophy 2024 venue : लवकरच दुलीप ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयने एक महत्त्वाची माहिती दिली अन् भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. रवींद्र जडेजासह, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी आगामी स्पर्धेतून माघारी घेतली आहे. त्यामुळे सिराजच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळाली, तर क संघात गौरव यादवने उमरान मलिकची जागा घेतली. सिराज आणि मलिक दोघेही आजाराने त्रस्त असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय ब संघातील अष्टपैलू रवींद्र जडेजा हा देखील या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बंगळुरुतील चिन्नस्वामी स्टेडियमवर सर्व सामने पार पडतील. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्यांना बांगलादेशविरुध्दच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते.
स्पर्धेसाठी चार संघ खालीलप्रमाणे
अ संघ - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
ब संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.
क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, गौरव यादव, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.
ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.
Web Title: star bowler Mohammed Siraj Ruled Out and No Ravindra Jadeja As BCCI Update Duleep Trophy 2024 Squads, read here in details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.