Join us  

शिखर धवनचा 10 हजारी क्लबमध्ये समावेश; व्हिव्हियन रिचर्ड्सना मागे टाकत केला विशेष कारनामा!

india vs sri lanka : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्याची धुरा सोपविण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 11:15 AM

Open in App

नवी दिल्ली - श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या शिखर धवनने पहिल्याच सामन्यात जोर दार अर्धशतक ठोकले. महत्वाचे म्हणजे या सामन्यात शिखरने एक अत्यंत विशेष कामगिरी केला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. याच बरोबर त्याने एकदिवसीय सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याच्या बाबतीत वेस्टइंडीजचे माजी दिग्गज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकले आहे.

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडेविराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नवा कर्णधार शनाकाने टॉस जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, निर्धारित 50 षटकांत श्रीलंकेला 9 बाद 262 धावाच करता आल्या.

IND vs SL 1st ODI : शिखर धवननं कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात मोडला अजित वाडेकर यांचा १९७४ सालचा विक्रम

धवनने व्हिव्हियन रिचर्ड्सना मागे सोडले - श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात धवनने या फॉरमॅटमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या. या टप्प्यापर्यंत सर्वात जलद पोहोचण्याच्या बाबतीत धवनने वेस्टइंडीजचे माजे दिग्गज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले आहे. 140व्या एकदिवसीय सामन्यात त्याने 6 हजार धावा पूर्ण केल्या. तर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना हा टप्पा पार करण्यासाठी 141 वा सामना खेळावा लागला होता. सर्वात जलद 6 हजार वनडे धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिम अमला (123) च्या नावे आहे. तर विराट कोहली (136) दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन (139) तिसऱ्या स्थानावर आहे.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धवनच्या 10 हजार धावाही पूर्ण -धवनने श्रीलंकेविरुद्ध खेळताना रविवारी एका अत्यंत विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. हा सामना खेळण्यापूर्वी धवनच्या खात्यात 9965 धावा होत्या. यानंतर 35 धावा करताच तो 10 हजारी क्लबमध्ये सामील झाला.  

टॅग्स :शिखर धवनभारतीय क्रिकेट संघक्रिकेट सट्टेबाजीविराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंका