दिग्गज क्रिकेटर आणि माजी भारतीय टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाचा माजी कोच राहुल द्रविड यानं टीम इंडियातील सुपरस्टार खेळाडूं संदर्भात बिनधास्त वक्तव्य केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार क्रिकेटर विराट कोहलीसह अन्य स्टार क्रिकेटरसंदर्भात लोक जो विचार करतात ते बऱ्याचदा चुकीच असते. असे तो म्हणाला आहे. ड्रेसिंग रुमध्ये या मंडळींना जवळून पाहिल्यानंतर त्यांच्यात जे दिसलं ते प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न द्रविडनं आपल्या खास मुलाखतीत केल्याचे दिसून येते. द्रविड हा जवळपास अडीच वर्षे भारतीय संघासोबत कोचच्या रुपात होता.
द्रविडनं शेअर केली टीम इंडियातील खेळा़ूंसदर्भातील खास गोष्ट
स्टारस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत द्रविडनं खेळाडूंच्या स्वभावासंदर्भातही गप्पा गोष्टी केल्या. तो म्हणाला की, कर्णधाराशिवाय संघातील वरिष्ठ खेळाडूंचा गट देखील संघाचे नेतृत्व करत असतो. रोहितसोबत काम करणं ही सौभाग्याची गोष्ट होती. तो एक उत्तम लीडर होता. सहाजिकच त्याच्यासह टीम इंडियाकडे लोक अगदी सहज आकर्षित झाले, अशी गोष्ट द्रविडनं बोलून दाखवलीये.
रोहित-विराटसह सुपर स्टार क्रिकेटर्स अहंकारी असतात?
द्रविड पुढे म्हणाला की, संघात विराट, जसप्रीत बुमराह आणि कसोटी क्रिकेटमध्ये अश्विन सारखे मोठी नाव असणारे खेळाडू आहेत. ते सुपरस्टार आहेत. त्यांचा तगडा फॅन फॉलोअर्स आहे. कधी कधी लोक असा विचार करतात की, सुपरस्टार झाल्यामुळे ते अंहकारी असतील. त्यांना मॅनेज करणं खूप कठीण काम असेल. पण माझ्याबाबतीत असं काही घडलं नाही. त्यामुळे यात बहुतांश वेळा लोक ज्याचा विचार करतात त्यात तथ्य नाही, असेच वाटते. बहुतांश सुपरस्टार क्रिकेटर आपल्या तयारीसाठी विनम्र आहेत. त्यामुळेच ते सुपरस्टार झाले आहेत, हे सांगायलाही द्रविड विसरला नाही.
शेअर केली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खासियत
यावेळी द्रविडनं ३७ वर्षीय अश्विनचा दाखलाही दिला. या वयातही तो काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक दिसतो. खेळाडूंसोबत काम करत असताना वेगवेगळ्या पातळीवर काम करावे लागते. काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. पण प्रामाणिक सांगायचं तर मला जो ग्रुप मिळाला तो सर्वोत्तम होतो. त्यामुळे चांगले वातावरण निर्माण करणं अगदी सहज सोपे झाले. याचे श्रेय त्याने कॅप्टन्सह संघातील वरिष्ठ खेळाडूंना दिले आहे