भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली. पण, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसनला संधी न मिळाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. खासदार शशी थरूर यांनी सॅमसन कर्णधार असायला हवा होता असे म्हटले. वारंवार सॅमसनला वगळल्याने तो अनलकी क्रिकेटर असल्याची भावना चाहत्यांमध्ये रूजली. पण याबद्दल बोलताना सॅमसनने सर्वांना चुकीचे ठरवले आणि रोहित शर्माचे आभार मानले.
संजू सॅमसन म्हणाला की, लोक मला सर्वात अनलकी क्रिकेटपटू म्हणतात, परंतु मी सध्या जिथे पोहोचलो आहे. ते मला वाटते की खूप आहे. कारण मी विचारही केला नव्हता जे मला मिळाले आहे. संजू धन्य वर्मा या युट्यूब चॅनेलवर बोलत होता.
रोहितचे मानले आभारभारताचा नियमित कर्णधार आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणाऱ्या रोहितबद्दल सॅमसनने म्हटले, "रोहित शर्मा हा पहिला आणि दुसरा माणूस होता, ज्याने फिल्डवर येऊन माझ्याशी संवाद साधला. तो मला म्हणाला, "अरे संजू कसा आहेस... तू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीस, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध खूप षटकार मारलेस. तू खरोखरच चांगली फलंदाजी केलीस."
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.