Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

टीम इंडियाला पुढील महिन्याच्या अखेरीस आशिया कपही खेळायचा आहे. यामुळे विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:02 AM2022-07-20T10:02:36+5:302022-07-20T10:04:10+5:30

whatsapp join usJoin us
Star Indian cricketer Virat kohli can play odi series against zimbabwe after 9 years team india vs zim | Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यानंतर आता ब्रेक घेतला आहे. तो जवळपास एक महिना टीम इंडियापासून दूर असेल. टीम इंडियाला पुढील महिन्याच्या अखेरीस आशिया कपही खेळायचा आहे. यामुळे विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. त्याचा फॉर्म पाहता सिलेक्टर्सनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे तो आशिया चषकापूर्वी, एका अशा संघाविरुद्ध खेळताना दिसेल, ज्यांच्याविरुद्ध त्याने तब्बल 9 वर्षांपासून एकही वनडे मालिका खेळलेली नाही.

या संघाविरुद्ध खेळू शकतो विराट -
सध्या विराट कोहलीला (Virat Kohli) धावा जमवण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. तो नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही फ्लॉप ठरला. यावर्षात टीम इंडियाला आशिया चषक (Asia Cup) आणि वर्ल्डकप (T20 World Cup) सारखे मोठे टोर्नामेंट्स खेळायचे आहेत. यामुळे, लवकरात लवकर फॉर्ममध्ये येण्यासाठी, विराट कोहलीने 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर, ऑगस्ट महिन्यात झिंम्बाब्वे विरुद्ध वनडे इंटरनॅशनल सीरीजमध्ये भाग घ्यावा, अशी संघाच्या सेलेक्टर्सची इच्छा आहे.

विराट झिंबाब्वे विरुद्ध 9 वर्षांपासून एकही वनडे सीरीड खेळलेला नाही - 
विराट कोहली ऑगस्टच्या अखेरीस झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. यापूर्वी विराट 2015 च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना दिसला होता. महत्वाचे म्हणजे, 2013 नंतर विराट कोहलीने झिम्बाब्वेविरुद्ध एकही वनडे मालिका खेळलेली नाही. विराट कोहली आपला गमावलेला फॉर्म परत मिळविण्यासाठी तब्बल 9 वर्षांनंतर झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसू शकतो.

सेलेक्टर्सचा मोठा निर्णय -
टीम इंडियाच्या (Team India)  सिलेक्टर्सनी विराट कोहलीला फॉर्ममध्ये आणण्यासाठी झिम्बाब्वे सीरीजमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. सिलेक्शन कमिटीचे एक सदस्य इनसाइड स्पोर्ट्सोबत बोलताना म्हणाले, 'आशा आहे, की क्रिकेटमधून घेतलेली विश्रांती विराटला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवेल. विराटने आपला फॉर्म परत आणण्यासाठी झिंम्बाब्वे विरुद्ध खेळावे. हा कोहलीचा आवडता फॉरमॅट आहे. यामुळे विराटला फॉर्ममध्ये येण्यासाठी मोठी बदत होईल.'


 

Web Title: Star Indian cricketer Virat kohli can play odi series against zimbabwe after 9 years team india vs zim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.