T20 World Cup 2024 : आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २ जूनपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेआधी काही सराव सामने खेळवले जातील. १ जून रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होईल. आगामी विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्ट्सने भारी प्रोमो जारी करून क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले. भारताने शेवटच्या वेळी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून भारताच्या खात्यात ट्रॉफीचा दुष्काळ आहे. त्यामुळे पुढील महिन्यात हा दुष्काळ संपतो का हे पाहण्याजोगे असणार आहे.
२००७ मध्ये भारताने ट्वेंटी-२० विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. सिक्सर किंग युवराज सिंगने तेव्हा इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात स्टुअर्ड ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकून कमाल केली. २००७ च्या विश्वचषकाच्या आठवणी आजतागायत तमाम भारतीयांच्या मनात कायम आहेत.
स्टार 'स्पोर्ट्स'चा प्रोमो
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ -
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
Web Title: Star Sports has released a promo for T20 World Cup 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.