Join us  

स्टार्क, लियोनची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिका सर्व बाद १६२

मिशेल स्टार्क (५/३४) आणि नॅथन लियोन (३/५०) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत संपुष्टात आणला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 11:55 PM

Open in App

डर्बन : मिशेल स्टार्क (५/३४) आणि नॅथन लियोन (३/५०) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलिया संघाने पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांत संपुष्टात आणला. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ३५१ धावांवर संपला होता. आॅस्ट्रेलियाकडे १८९ धावांची आघाडी आहे.तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅँकोटला (५) बाद करत फिलॅँडरने आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. ख्वाजाही (१४) लगेचच स्वस्तात परतला. रबाडाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र डेव्हिड वॉर्नर व स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने ५१ तर स्मिथने ५६ धावा केल्या. या दोघांनी तिसºया गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. वॉर्नरला फिलँडरने तर स्मिथला महाराजने बाद केले. त्यानंतर शॉन मार्श व मिशेल मार्श यांनी आघाडी सांभाळली. मिशेलने १३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ९६ धावा केल्या. शॉन मार्शने ४० धावा केल्या.मार्श बाद झाल्यानंतर स्टार्क (३५) वगळता कोणीही मोठी खेळी करू शकला नाही. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ३५१ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने १२३ धावा देत ५ बळी मिळवले. फिलॅँडरने ३ तर रबाडाने दोन बळी घेतले.उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेची सुुरुवातही खराबच झाली. नॅथन लियॉनने एकाच षटकात एल्गर (७) व हशिम आमला (०) यांना बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर मार्कराम व डिव्हिलियर्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कमिन्सने मार्करामचा (३२) अडथळा दूर केला, तर डुप्लेसिस (१५) व टी.बी.डी. ब्रुयेनला (६) बाद करत आफ्रिकेसमोरील संकटअधिकच गहिरे केले. त्यामुळे द. आफ्रिकेची स्थिती ५ बाद १०८ अशी झाली होती.आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्सने एका बाजूने किल्ला लढवणे सुरू ठेवले होते. यष्टिरक्षक क्वांटन डीकॉकचा (२० ) खराब फॉर्म कायम राहिला. त्याला लियोनने तंबूचा रस्ता दाखवला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफ्रिकेने ६ बाद १५० धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्स ७१ धावांवर नाबाद राहिला. तर मार्करामने ३२ धावा केल्या.>संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : बॅनस्कॉफ्ट झेल. डी कॉक गो. फिलिंडर ५, वॉर्नर झे. डिव्हीलियर्स गो. फिलिंडर ५१, ख्वाजा झे. डी कॉक गो. रबाडा १४, स्मिथ झे. डिव्हीलियर्स गो. महाराज ५६, मार्श झे. डिव्हीलियर्स गो. महाराज ४०, मार्श झे. मॉर्केल गो. फिलिंडर ९६, पैन झे. डी कॉक गो. रबाडा २५, कमिन्स त्रिफळा गो. महाराज ३, स्टार्क गो. महाराज ३५, लियोन झे. ब्रुयेन गो. महाराज १२, हॅथलवूड नाबाद २, अवांतर १२. सर्वबाद ३५१; गोलंदाजी : फिलिंडर २७-१२-५९-३, महाराज ३३.४-५-१२३-५, रबाडा २५-७-७४-२.द. आफ्रिका : एल्गर झे.गो. लियोन ७, मार्कराम झे. बॅनस्कॉफ्ट गो. कमिन्स ३२, आमला झे. बॅनस्कॉफ्ट गो. लियोन ०, डिव्हीलियर्स नाबाद ७१, डु प्लेसिस झे. पैन गो. स्टार्क १५, ब्रुयेन झे. पैन गो. स्टार्क ६, डी कॉक त्रिफळाचित गो.लियोन २०, फिलॅँडर ८, महाराजा 0, रबाडा ३, मॉर्केल 0. एकूण ५१.४ षटकांत सर्व बाद १६२; गोलंदाजी : स्टार्क १0.४-३-३४-५, हेजलवूड १३-५-३१-१, लियोन १६-३-५0-३, कमिन्स १२-२-४७-१.