महान फलंदाज सचिन तेडुलकरचा आज वाढदिवस... नेहमीप्रमाणे आईचे आशीर्वाद घेऊन त्यानं आजच्या दिवसाची सुरुवात केली. वाढदिवशी 47 वर्षीय सचिनला आईकडून अनमोल गिफ्ट मिळालं. मास्टर ब्लास्टरनं सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो पोस्ट करून त्याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सचिननं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय प्रवासातील दुर्मीळ फोटो
कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्ध्याची भूमिका बजावत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा ४७ वर्षांचा झाला आहे. तथापि यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा त्याने निर्णय घेतला. ‘ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही. कोरोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर नर्सेस, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्याची वेळ असल्याचे,’सचिनच्या निकटवर्तीयांचे मत आहे. सचिनने कोरोनाविरुद्ध लढासाठी ५० लाख रुपये दान दिले आहेत.
गौतम गंभीरनं जपली माणुसकी; घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार
तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटीत 51 शतकं झळकावली आहेत. 200 कसोटी क्रिकेट खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याशिवाय सर्वाधिक 463 वन डे सामन्यांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तेंडुलकरनं एकूण 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि त्यात 34,357 धावा केल्या. जगात कोणत्याही क्रिकेटपटूला 30 हजार आंतरराष्ट्रीय धावा करता आलेल्या नाहीत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या...
सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...
अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...
विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा
2007मध्ये निवृत्ती घेणार होता सचिन तेंडुलकर, पण परदेशातून फोन आला अन्...
Irfan Pathanने समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे कान टोचले; करून दिली जबाबदारीची जाणीव
एक जुलैपर्यंत कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही; क्रिकेट मंडळाचा मोठा निर्णय