IPL 2023 मध्ये भारताचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याचा लंडनमधील एका अडल्ट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये १ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान त्याच्या हिप फ्लेक्सरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमधून आणि आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC 2023) फायनलमधून माघार घेतली. शस्त्रक्रियेसाठी तो लंडनला गेला होता आणि तिथेच सध्या आहे. त्याने तेथील काही फोटोही शेअर केले होते. पण, चर्चा रंगली ती व्हायरल व्हिडीओची...
LSG साठी IPL 2023 मध्ये राहुलने ९ सामन्यांमध्ये २ अर्धशतके आणि ११३.१२ च्या स्ट्राइक रेटसह २७४ धावा केल्या. दरम्यान, केएल राहुलचा सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावरील छोट्या क्लिपमध्ये लंडनमधील लक्स क्लब नावाच्या स्ट्रिप क्लबमध्ये भारताचा माजी उपकर्णधार, स्टेजवर एका डान्सरला बघतानाचा दिसतोय. या व्हायरल व्हिडीओनंतर नेटिझन्सनी लोकेश राहुलसह त्याची पत्नी अथिया हिलाही ट्रोल केले. दिवसभर हे ट्रोलिंग सुरू होतं अन् अखेर अथियाने सडेतोड उत्तर दिले.
अथिया शेट्टीची इंस्टा स्टोरी... ''मी शक्यतो शांत राहणे आणि प्रतिक्रिया न देणे पसंत करते, परंतु काहीवेळा स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं असतं. राहुल, मी आणि आमचे मित्र आम्ही नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे वायफळ चर्चा करणं थांबवा, त्या करण्याआधी फॅक्ट चेक करा,''असे अथियाने लिहिले.
Web Title: Statement from Athiya Shetty about the video circulating in social media of KL Rahul, Athiya & his friends.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.