ठाणे : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने २०२० या वर्षासह २०२४, २०२८ व २०३२ या वर्षांत होणाºया ‘आॅलिम्पिक व्हिजन’ कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हानिहाय प्रावीण्यप्राप्त सर्व गटांतील खेळाडंूची वैयक्तिक व खेळाबाबत माहितीसाठी ‘गुगल फॉर्म’ तयार केला आहे. त्यामध्ये वैयक्तिक माहितीसह खेळासंबंधीची माहिती भरण्याची संधी जिल्ह्यातील गुणवत्ताप्राप्त खेळाडूंना देण्यात आली आहे.हा गुगल फॉर्म शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व गटांतील प्रावीण्यप्राप्त खेळाडू, पालक, शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे, त्यांचे प्रशिक्षक आदींनी या संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन वैयक्तिक व खेळासंबंधी माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. माहिती भरलेल्या अर्जाची एक कॉपी ठाणे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे फोटोसह सादर करावयाची आहे.याकरिता २०१६-१७ मधील सर्व गटांच्या खेळनिहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा, अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाचे प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसह शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्पर्धा व वर्ल्ड विद्यापीठ क्र ीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय व तृतीय व सहभाग असलेले खेळाडू यांची माहिती व दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) आपली कामगिरी फॉर्ममध्ये देण्यात आलेल्या खेळ प्रकारानुसार माहिती भरणे आवश्यक आहे. याबाबत, काही शंका असल्यास ठाणे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी आयुक्त क्र ीडा व युवक सेवा यांनीकेले आहे.>या खेळांचा आहे समावेशया आॅलिम्पिक व्हिजन कृती आराखड्यामध्ये अॅथलेटिक्स, अॅक्वेटिक, सायकलिंग, ट्रायथलॉन, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शूटिंग, ज्युदो, कबड्डी, खोखो, तायक्वाँदो, टेनिस, क्रि केट, सॉफ्टबॉल, बुद्धिबळ, योगा, तलवारबाजी आदी खेळ प्रकारांचा आराखडा या आॅलिम्पिक व्हिजन कृती आराखड्यामध्ये समावेश आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- राज्याचा आॅलिम्पिक व्हिजन आराखडा
राज्याचा आॅलिम्पिक व्हिजन आराखडा
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने २०२० या वर्षासह २०२४, २०२८ व २०३२ या वर्षांत होणाºया ‘आॅलिम्पिक व्हिजन’ कृती आराखडा तयार केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:19 AM