Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेला २७ ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने सुरुवात होणार आहे. India vs Pakistan यांच्यात २८ ऑगस्टला होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे आणि १३२ देशांमध्ये आशिया चषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक डिमांड आहे. हाँगकाँग आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा अखेरचा संघ ठरला आहे आणि आता वेळापत्रक पूर्ण झाले आहे. सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि त्यांनी सरावाला सुरुवातही केली आहे. काल क्रिकेट चाहत्यांसाठी दुग्धशर्करा योग जुळून आला, विराट कोहली व बाबर आजम ( Virat Kohli meets Babar Azam in Dubai) यांची ग्रेट भेट झाली.
दोन दिग्गज खेळाडूंमधील स्टॅटिस्टीकली तुलना
- बाबर आजमने २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट कोहलीसोबत तुलना होतेय. विराटने २०१६ ते २०१८ हा कालावधी गाजवला, परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख उतरता राहिला आहे. २०१९पासून वन डे क्रिकेटमध्ये बाबर आजमचे नाणे खणखणीत वाजले आहे आणि सध्या तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
- विराट कोहलीने १०२ कसोटीत ८०७४ धावा, २६२ वन डे सामन्यांत १२३४४ धाव आणि ९९ ट्वेंटी०२० सामन्यांत ३३०८ धावा केल्या आहेत. बाबरने ४२ कसोटी ३१२२ धावा, ९२ वन डे सामन्यांत ४६६४ धावा आणि ७४ ट्वेंटी०२सामन्यांत २६८६ धावा केल्या आहेत.
- २०१५ पासून विराटने कसोटीत ५२च्या सरासरीने ७० सामन्यांत ५७२० धावा आहेत, तर बाबरने ४७.३० च्या सरासरीने ४२ सामन्यांत ३१२२ धावा केल्या आहेत. विराटने या कालावधीत १८ व बाबरने ७ शतकं झळकावली आहेत.
- वन डे क्रिकेटमध्ये विराटने २०१५ पासून आतापर्यंत ६३.९१च्या सरासरीने ६१३६ धावा केल्या असून त्यात २२ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. बाबरने ५९.७९च्या सरसरीने ४६६४ धावा करताना १७ शतकं व २२ अर्धशतकं झळकावली आहेत.
- ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विराटला पाकिस्तानी कर्णधाराने मागे टाकले आहे. २०१५ पासून बाबरने ७४ सामन्यांत ४५.५२ च्या सरासरीने २६८६ धावा करताना १ शतक व २६ अर्धशतकं झळकावली आहेत. विराटने ७१सामन्यांत ५१.९१च्या सरासरीने २३३६ धावा केल्या असून त्यात २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
Web Title: Statistical comparison : Virat Kohli shaking hands with such a warmth gesture and Babar Azam in return with a big smile ahead of Asia Cup 2022, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.