मुंबई : कोणत्याही खेळात तंदुरूस्तीला फार महत्त्व आहे. कौशल्याला तंदुरूस्तीची जोड मिळाल्यास खेळाडू यशाचे शिखर सर करतोच. त्यात तंदुरूस्त असल्यामुळे मानसिक बळही मिळते आणि त्याचा कामगिरी उंचावण्यास हातभार लागतो. सर्व खेळाडू तंदुरूस्तीवर अधिक भर देतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतात. तंदुरूस्तीची चर्चा होत असताना कॅरेबियन खेळाडूंचा उल्लेख न होणे चुकीचे ठरेल. कॅरेबियन खेळाडू स्वतःला तंदुरूस्त ठेवण्यासाठी अनेक तास मेहनत घेतात आणि त्यांच्या या मेहनतीचा व्हिडीओ पाहिलात तर तुम्ही थक्क व्हाल.
क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. उत्तुंग षटकार खेचणारा हा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. गोलंदाजीतही त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच्या फिटनेस मागचे रहस्य व्हिडीओ पाहून उलगडेल...