Join us  

तेव्हा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले, पंच स्टीव्ह बकनर यांनी आता मान्य केले

सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वाग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताजा असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 6:09 PM

Open in App
ठळक मुद्देसचिनला तेव्हा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवल्याबद्दल बकनर यांन आता खेद व्यक्त केला आहेमी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले. त्या माझ्या दोन चुका होत्याकुठलाही पंच जाणूनबुजून चुका करत नाही. त्या चुका होतात

बार्बाडोस - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा जमवल्या. या काळात सचिनला अनेकदा पंचांच्या चुकीच्या निर्णयांची शिकारदेखील व्हावे लागले. सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वाग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताजा असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र सचिनला तेव्हा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवल्याबद्दल बकनर यांन आता खेद व्यक्त केला आहे.

एकेकाळी आयसीसीच्या अव्वल पंचांच्या यादीत असलेल्या स्टिव्ह बकनर यांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवल्याच्या दोन प्रसंगांचा उल्लेख केला आहे. बार्बाडोसमधील मेसन अँड गेस्ट नावाच्या रेडिओ कार्यक्रमात सहभागी झालेले बकनर म्हणाले की, ‘’मी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले. त्या माझ्या दोन चुका होत्या. कुठलाही पंच जाणूनबुजून चुका करत नाही. त्या चुका होतात. त्यामुळे पंचांचे भविष्य उद्ध्वस्त होते.’’

‘’चुका ह्या माणसाकडून होतात. २००३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ब्रिस्बेन कसोटीत मी सचिनला पायचित ठरवले होते. मात्र तेव्हा चेंडू स्टम्पवरून जात होता.  त्यानंतर २००५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कोलकाता कसोटीत मी अब्दुल रझाकच्या गोलंदाजीवर सचिनला झेलबाद ठरवले होते. त्यावेळी बॅटजवळून गेल्यानंतर चेंडूची दिशा बदलली होती. मात्र त्याला बॅटचा स्पर्श न होताच तो यष्टीरक्षकाजवळ गेला होता. तो सामना ईडन गार्डनवर झाला होता. ईडन गार्डनवर तुम्ही भारताची फलंदाजी सुरू असताना पंच म्हणून काम करत असाल तर तुम्हाला फार ऐकू येत नाही. कारण इथे सुमारे एक लाख लोक जल्लोष करत असतात. मात्र या दोन त्या चुका आहेत. ज्याबद्दल मी आजही नाखूश आहे. पण चुका ह्या माणसाकडून होतात आणि चुका मान्य करणे हा जीवनाचा भाग आहे.  

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय क्रिकेट