मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) यंदाचं १४ वं सीझन सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचं संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीपासून ते आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:10 AM2021-04-27T10:10:08+5:302021-04-27T10:10:39+5:30

whatsapp join usJoin us
steve smith and david warner could leave as australia mulls suspension of flights from india ipl 2021 coronavirus in india | मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती

मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचं (IPL) यंदाचं १४ वं सीझन सुरू असून देशातील वाढत्या कोरोनाचं संकट आता स्पर्धेवरही येण्याची शक्यता आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीपासून ते आतापर्यंत चार परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं दोन आणखी दिग्गज खेळाडू मायदेशी परतण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सनरायझर्स  हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएलमधून माघार घेऊन लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला परतण्याची शक्यता आहे. याआधीच ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांच्यासोबत राजस्थान रॉयल्सचा अँड्रयू टाय यांचा समावेश आहे. (Steve Smith And David Warner Could Leave As Australia Mulls Suspension Of Flights From India IPL 2021 Coronavirus In India)

सूर्यकुमारला रिलिज करणे केकेआरची मोठी चूक - गौतम गंभीर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ऑस्ट्रेलिया प्रशासनाकडून भारतातून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून बंदीची घोषणा होण्याआधीच वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतण्याच्या विचारात असल्याचं समजतं. इतकंच नव्हे, तर खेळाडूंसोबतच आयपीएलमध्ये सहभागी असलेले ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक, समालोचक अशा एकूण ३० ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी आयपीएलमधून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं मायदेशी परतणं योग्य असल्याची भावना ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. ऑस्ट्रेलियन सरकारकडून लवकरच त्यांच्या देशाच्या सर्व सीमा सील करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत ऑस्ट्रेलियानं कोणताही कठोर निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशी परतण्यास अडचण होईल त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

भारतात अडकलेत ऑस्ट्रेलियाचा ८ हजार नागरिक
ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री केरन अँड्रूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ऑस्ट्रेलियाचे एकूण ८ हजार नागरिक असून त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. सलग पाचव्या दिवशी भारतात कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाखांहून अधिक आढळून आल्यानं ऑस्ट्रेलियन सरकार सतर्क झालं आहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू ख्रिस लीन यानं तर आयपीएल संपल्यानंतर मायदेशात परतण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडे चार्टड प्लेनची व्यवस्था करण्याची विनंती केल्याचीही माहिती समोर आली आहे. जेणेकरुन ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू सुरक्षितरित्या मायदेशात परतू शकतील. याउलट मुंबई इंडियन्सचा गोलंदाज नेथन कुल्टर नाइल यानं तर बायो बबलमध्ये राहणं जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अॅडम झम्पा आणि अँड्रूयू टाय यांच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयानं आश्चर्याचा धक्काच बसला असंही तो म्हणाला आहे. 
 

Web Title: steve smith and david warner could leave as australia mulls suspension of flights from india ipl 2021 coronavirus in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.