स्टीव्ह स्मिथ स्वत:च्या पसंतीचे खेळाडू निवडतो, रॉडनी हॉग यांचा आरोप

कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा पक्षपाती असून, स्वत:च्या पसंतीचे खेळाडू संघात निवडतो, असा आरोप आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रॉडनी हॉग यांनी स्मिथवर केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:55 AM2017-09-28T01:55:42+5:302017-09-28T01:55:51+5:30

whatsapp join usJoin us
 Steve Smith chooses his own favorite player, Rodney Hogg's charge | स्टीव्ह स्मिथ स्वत:च्या पसंतीचे खेळाडू निवडतो, रॉडनी हॉग यांचा आरोप

स्टीव्ह स्मिथ स्वत:च्या पसंतीचे खेळाडू निवडतो, रॉडनी हॉग यांचा आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न : कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा पक्षपाती असून, स्वत:च्या पसंतीचे खेळाडू संघात निवडतो, असा आरोप आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रॉडनी हॉग यांनी स्मिथवर केला आहे. भारताविरुद्ध सध्याच्या मालिकेत पराभवाच्या खाईत लोटल्याबद्दल त्यांनी संघव्यवस्थापनावर सडकून टीकाही केली. वन डे मालिकेत हा संघ ०-३ ने माघारला आहे.
एका कार्यक्रमात हॉग म्हणाले, ‘स्मिथ स्वमर्जीने खेळाडू निवडतो. त्याने निवडकर्ता बनू नये. त्याने
अ‍ॅश्टन एगरला बाहेर केले, पण कार्टराईट संघात कायम आहे. निक मॅडिसन हा आवडता खेळाडू किंवा मित्र असावा. त्याला स्मिथने संधी दिली. संघात मित्राला निवडण्याचा अधिकार कुणी दिला. पक्षपात न पाळता संघ निवडणे गरजेचे आहे. कर्णधार संघ निवडीत मनमानी करीत आहे.’
आॅस्ट्रेलियन निवड समितीच्या कामाची समीक्षा करण्यात यावी, अशी मागणी करीत माजी वेगवान गोलंदाज हॉग पुढे म्हणाले, ‘संघात सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. संपूर्ण क्रिकेट आॅस्ट्रेलियात वरपासून खालपर्यंत आमूलाग्र बदल करावेच लागतील.’ (वृत्तसंस्था)

वॉर्नरने आरोप फेटाळले
रॉडनी हॉग यांचे आरोप सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने फेटाळून लावले. चौथ्या वन डेपूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात वॉर्नर म्हणाला, ‘सर्वांना स्वत:ची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अशा गोष्टी कुठून येतात याची मला जाणीव नाही. संघ निवड ही निवडकर्त्यांच्या हातात असते.
ज्याची निवड झाली त्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागते. निवडीसाठी कुणीही वशीला लावत नाही. जो चांगली कामगिरी करेल, त्याला संघात स्थान मिळेल, ह सोपे सूत्र आहे.’

Web Title:  Steve Smith chooses his own favorite player, Rodney Hogg's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.