अॅडलेड : पुढील वर्षी मायदेशात आयोजित होणाऱ्या विश्वचषकाआधी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले आहे. चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोघांवर बंदी घालण्यात आली होती. कसोटी व एकदिवसीय संघात परतल्यानंतर दोघेही आता टी२० संघात परतले आहेत. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांचा विश्वचषक वारंवार जिंकला असला, तरी टी२० विश्वचषक जिंकण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही.
राष्ट्रीय निवडकर्ते ट्रॅव्हर होन्स म्हणाले, ‘भविष्याचा विचार करून आम्ही संघ निवडला आहे. सर्व खेळाडू संघाच्या गरजेनुसार कामगिरी करण्यास सज्ज आहेत. अॅरोन फिंचकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. स्मिथ मार्चपर्यंत संघाचे नेतृत्व करू शकत नाही. अशावेळी अॅशेस मालिकेत शानदार कामगिरी करणाºया स्मिथला येथे फलंदाज म्हणून झंझावात करावा लागणार आहे.’
दुसरीकडे वॉर्नरने या प्रकारात संघासाठी सर्वाधिक धावा काढल्या आहेत. गोलंदाजीची भिस्त पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क यांच्यासह अँड्रयू टाय, केन रिचर्डसन व बिली स्टानलेक यांच्यावर असेल. पाकिस्तानला टी२० मालिकेत लोळविणाºया लंका संघाचे आत्मबळ उंचावले आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे लंकेने कमकुवत संघ पाक दौºयावर पाठविला तथापि आॅसीविरुद्ध आता मुख्य खेळाडू संघात परतले आहेत.
Web Title: Steve Smith, David Warner return to Australia's T20 squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.