नवी दिल्ली - स्टीव्ह स्मिथ जगभरातील नामांकित फलंदांपैकी एक आहे, ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूची ख्याती एक आक्रमक खेळाडू म्हणून जगभर आहे. तो त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे अनेकवेळा चर्चेत राहिला आहे. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील किंग्स रोड येथील घर विकले आहे. यामुळे त्याला दुप्पट फायदा झाला आहे. स्टीव्ह स्मिथ आक्रमक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तो आपल्या आंतरराष्ट्रीय संघातून आणि जगातील अनेक लीगमध्ये खेळून पैसे कमवत असतो. हे आपल्या कष्टाचे पैसे त्याने अनेक गोष्टींमध्ये गुंतवले आहेत.
इनसाइट स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, किंग्स रोडवरील घर स्टीव्ह स्मिथ आणि त्याची पत्नी डॅनी विलिस यांनी २०२० मध्ये ३५ कोटी रूपयांना विकत घेतले होते. या घराच्या आतील भाग अतिशय सुंदर आहे. तसेच हे घर राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. चार बेडरूम, तीन बाथरूम असणाऱ्या या घराची खरेदी करण्यासाठी चार मोठ्या पार्टींनी नोंदणी केली होती.
विशेष बाब म्हणजे स्टीव्ह स्मिथचे घर खूप चांगल्या ठिकाणी आहे. यामध्ये जिम, मोठा हॉल आणि बाहेर बसण्याची उत्तम सोय आहे. तसेच घरातून खिडकीच्या बाहेरून एका चांगल्या निसर्गाचा अनुभव पाहायला मिळतो. स्टीव्ह स्मिथने त्याच्या या बहुचर्चित घराची विक्री तब्बल ६५ कोटींना केली आहे, त्यामुळे त्याला जवळपास ३० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
सध्या स्टीव्ह स्मिथ श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. २ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून कांगारूच्या संघाने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र स्टीव्ह स्मिथ सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. मोठ्या कालावधीपासून त्याने एकही मोठी खेळी केली नाही. विशेष म्हणजे स्टीव्ह स्मिथने पहिल्या सामन्यात केवळ १० धावा केल्या होत्या.
Web Title: Steve Smith earn crores by selling a luxury home in Sydney
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.