स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' 

इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे सध्याच्या घडीला क्रिकेटमधील 'फॅब फोर' म्हणून ओळखले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 07:49 AM2018-02-24T07:49:12+5:302018-02-24T07:49:12+5:30

whatsapp join usJoin us
Steve Smith says, I have learnt a lot from Virat Kohli | स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' 

स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली -  भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यामध्ये मैदानावर झालेलं वाक्युद्ध आपण बऱ्याच वेळा अनुभवलं आहे. दोन्ही खेळाडू सध्याच्या घडीला क्रिकेटविश्वात अव्वल स्थानावर आहेत. यश या दोन खेळाडूच्या पायत खेळत आहे. दोघामध्ये सतत कलगितुरा पहायला मिळतो पण काल कांगारुचा कर्णधार  स्टीव्ह स्मिथनं केलेल्या वक्तव्यामुळं क्रिडाविश्वात अनेखांच्या भुवया उंचावल्या असतील. 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' असे काल cricket.com.au सोबत बोलताना स्मिथ याने कबुली दिली. 

इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे सध्याच्या घडीला क्रिकेटमधील फॅब फोर म्हणून ओळखले जातात. यांच्यामध्ये सतत प्रतिस्पर्धा असते. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीनं धावांचा रतीब लावला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ जरी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अपयशी ठरला असला तरी तो कसोटीमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे.

cricket.com.au शी बोलताना स्मिथनं खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवून एकप्रकारे सर्वांनाच धक्का दिला. तो म्हणतो. मी जगातील सर्वोत्तम फलंदाजांची करणाऱ्याचे निरीक्षण करतो आणि त्यांच्यासारखी फलंदाजीही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यात क्षमता असल्यामुळं हे लोक सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न करून जे हवे ते मिळवू शकता.  

स्मिथ नेहमीच त्याच्या खास शैलीत फलंदाजी करत असतो. त्याची सर्वांसारखी शास्त्रयुक्त फलंदाजी नाही. याबद्दल स्मिथने सांगितले की तो जगातील अनेक सर्वोत्तम फलंदाजांचे निरीक्षण करून तशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. पुढे बोलताना स्मिथ म्हणाला की, विराट कोहली ज्याप्रमाणे फिरकी गोलंदाजाला खेळतो त्याप्रमाणे सध्याच्या घडीला कोणताही फलंदाज खेळत नसेल. वेगवान आणि फिरकी गोलंदाजाला तो ऑफसाईडला चांगल्या पद्धतीनं फटकावत असतो. त्याची चेंडू फटकावण्याची वेगळी शैली आहे. ती अवगत करण्यासाठी मी विराट कोहलीकडून फलंदाजी कशी करायची हे शिकण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला जिथे शिकण्याची संधी मिळते तिथं शिकले पाहिजे. आपली कुमकुवत बाजू नेहमी स्ट्राँग बनवण्याचा प्रयत्न करायाला हवा. स्मिथने पुढे म्हणाला की,  प्रत्येकवेळी यशस्वीच होईल असे नाही, कधीतरी बाद होतोच. जिथे खेळतो तेथील वातावरणाप्रमाणे फलंदाजी शैलीत बदल करत असतो. 

यावर्षी कसोटीत केलेल्या कामगिरीमुळं स्मिथचे सर्वांकडून कौतुकही झाले. या कामगिरीच्या बळावर त्याला यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कारही मिळाला. तसेच यावर्षीचा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी दिल्या जाणाऱ्या 'बॉर्डर मेडल'चा मानकरी ठरला आहे.  2017 मध्ये स्मिथने भारत दौऱ्यात चार कसोटी सामन्यात 71.28 च्या सरासरीनं 499 धावा केल्या होत्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. 


 

Web Title: Steve Smith says, I have learnt a lot from Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.