Join us  

Steve Smith, IND vs AUS: भारत दौऱ्याआधी स्मिथचा 'रुद्रावतार'! १२ चेंडूत कुटल्या ६२ धावा, T20 मध्ये ठोकलं शतक

स्टीव्ह स्मिथ भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 5:29 PM

Open in App

Steve Smith, IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची आतापर्यंतची जबरदस्त कामगिरी हा त्याचा पुरावा आहे. सर्वांनाच याबाबत माहिती आहे. पण, त्याने नुकतेच टी२० मध्ये झंझावाती शतक (Steve Smith Century in T20) झळकावले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना अतिशय संयमाने सामोरा जाणारा स्टीव्ह स्मिथ टी२० क्रिकेटमध्ये कमी नसल्याचे त्याने दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) खेळताना स्टीव्ह स्मिथने जोरदार फटकेबाजी केली. त्याने अतिशय दमदार गोलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या तर उभारून दिलीच पण त्यासोबतच त्याने दमदार शतकही ठोकले.

सिडनी सिक्सर्स आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात स्टीव्ह स्मिथने आपला रूद्रावतार दाखवून दिला. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाने प्रथम फलंदाजी केली. स्टीव्ह स्मिथने त्याच संघाकडून आपले शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथने यावेळी संघाने सलामीला फलंदाजीस पाठवले आणि त्याने मैदानात उतरताच अॅडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक चेंडूला हवेची सफर घडवायची याच उद्देशाने स्टीव्ह स्मिथ मैदानात उतरल्याचे दिसत होते. या दरम्यान, तो चांगल्या चेंडूंना नीट सामना करत होता, पण चेंडू पट्ट्यात आला की तो करेक्ट कार्यक्रम करायचा.

स्टीव्ह स्मिथने T20 मध्ये ठोकलं दुसरं शतक

टी२० सामन्यात सिडनी सिक्सर्सची सुरुवात खराब झाली होती. त्यांची पहिली विकेट केवळ ३ धावांवर पडली. पण, ही विकेट पडल्यानंतर स्टीव्ह स्मिथच्या बॅटने आग ओकायला सुरूवात केली. त्याने मैदानात चहुबाजूंना धावांचा तुफान पाऊस पाडला. त्याने आपले शतक दमदार पद्धतीत पूर्ण केले. हे त्याचे टी२० मधील दुसरे शतक ठरले. स्टीव्ह स्मिथने अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध अवघ्या ५६ चेंडूत १०१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १२ वेळा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. त्याने आपल्या डावात ७ षटकार आणि ५ चौकार ठोकले. १८०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने त्याने झंझावाती खेळी केली. स्टीव्ह स्मिथला कोणत्याही गोलंदाजाला बाद करता आले नाही, अखेर तो धावा काढण्याच्या नादात धावबाद झाला.

भारत दौऱ्याआधी स्टीव्ह स्मिथचा झंझावाती फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन संघ आणि चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल याच दुमत नाही.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथबिग बॅश लीगभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App