कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सपुढे स्टीव्ह स्मिथच्या राजस्थानचे आव्हान

दोन्ही संघांना सोसावे लागणार उन्हाचे चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:06 AM2020-10-03T06:06:39+5:302020-10-03T06:06:53+5:30

whatsapp join usJoin us
Steve Smith's Rajasthan challenge ahead of Kohli's Royal Challengers | कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सपुढे स्टीव्ह स्मिथच्या राजस्थानचे आव्हान

कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सपुढे स्टीव्ह स्मिथच्या राजस्थानचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी : राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) यांच्यादरम्यान शनिवारी येथे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिवसा लढत खेळली जाणार आहे. त्यावेळी दव नव्हे तर उन्हाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. आयपीएलमध्ये केवळ १० दिवस प्रत्येकी दोन सामने होणार आहेत. त्याची सुरुवात या लढतीने होईल. त्यामुळे उर्वरित संघांनाही दिवसा खेळण्याचे आव्हान समजण्याची संधी मिळेल. राजस्थान संघातील युवा सलमीवीर यशस्वी जैस्वाल याला खेळविण्याची मागणी होत आहे, तथापि जोस बटलर आघाडीच्या फळीत खेळणार असल्याने यशस्वीला संधी मिळाली तरी तो मधल्या फळीतच येईल.

राजस्थान आणि आरसीबीने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. आरसीबीची सुरुवात चांगली झाली पण गचाळ क्षेत्ररक्षण आणि डेथ ओव्हरमधील सुमार गोलंदाजीचा त्यांना फटका बसला. या दोन्ही स्तरावर त्यांना सुधारणा करावीच लागेल. नवदीप सैनी याने मुंबईविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये कसदार मारा करीत विजय मिळवून दिला होता. याच सामन्यात अखेरच्या चार षटकात गोलंदाजांनी तब्बल ७९ धावा मोजल्या, हा विराटसाठी चिंतेचा विषय आहे. आरसीबीने मागच्या लढतीत इसुरू उदाना, अ‍ॅडम झम्पा आणि गुरकिरत मान यांना संघात स्थान दिले होते. हे तिन्ही खेळाडू उद्या देखील कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वॉशिग्टन सुंदर याच्याकडून गोलंदाजीला सुरुवात करुन घेण्याचे डावेच मागच्या सामन्यात यशस्वी ठरले होते.

डिव्हिलियर्सचा शानदार फार्म आरसीबीच्या जमेची बाजू आहे.शिवम दूबे याने देखील मागच्या सामन्यात उत्तुंग फटकेबाजीद्वारे कौशल्य सिद्ध केले होते. कोहली राजस्थानविरुद्ध मोठी खेळी करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. आतापर्यंत तीन सामन्यात कर्णधार विराटच्या केवळ १८ धावा आहेत.

राजस्थान । विदेशी खेळाडूंसह संघाचा समतोल साधल्या गेला. संजू सॅमसन, जोस बटलर यांची उपस्थिती. स्टीव्ह स्मिथचे कुशल नेतृत्व.
आरसीबी । डिव्हिलियर्सचा शानदार फॉर्म. वॉशिंग्टन सुंदरकडून गोलंदाजीची सुरुवात करण्याची रणनीती यशस्वी. अ‍ॅरोन फिंच फॉर्मात. गेल्या लढतीतील विजयामुळे संघात उत्साह.

राजस्थान । शारजाहच्या छोट्या मैदानावर संघ यशस्वी, पण दुबईतील मोठ्या मैदानावर संघ पराभूत. अबुधाबीमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान.
आरसीबी। कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय. क्षेत्ररक्षण लौकिकानुसार नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी चिंतेचा विषय.
 

Web Title: Steve Smith's Rajasthan challenge ahead of Kohli's Royal Challengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.