मुंबई : Indian Premier League (IPL 2020)चा अंतिम सामना होण्यास अद्याप चार दिवसांच अवधी आहे. मात्र त्याआधीच चर्चा सुरु झाली आहे ती भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची. ऑस्ट्रेलिया दौरा म्हटले की, वाद-विवाद होणार हे नक्की. त्यात आघाडीवर असतात ते यजमान ऑस्ट्रेलिया . मात्र याच ऑस्ट्रेलियाला आता त्यांचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने मोलाचा संदेश दिला असून त्याचा हा सल्ला ऑस्ट्रेलिया संघ कशाप्रकारे ऐकतात हे महत्त्वाचे आहे.
ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांची फलंदाजी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच भारतासाठी कर्णधार विराट कोहली, शिखर धवन महत्त्वाचे ठरतील. त्यातही कोहलीला रोखण्याचे मुख्य लक्ष्य ऑस्ट्रेलियाने बाळगले आहे. यासाठीच यजमान ऑस्ट्रेलिया कोहलीविरुद्ध स्लेजिंगचे अस्त्र नक्की वापरणार याची अपेक्षा सर्वांनाच आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने मात्र आपल्या खेळाडूंना ही चूक न करण्याचा सल्लाच दिला आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला १७ डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हल येथे दिवस-रात्र सामन्याने सुरुवात होईल. यानंतर २६ डिसेंबर, ७ जानेवारी आणि १५ जानेवारीपासून अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना होईल. या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी वॉने म्हटले की, ह्यस्लेजिंगमुळे विराट कोहलीला कोणतीही अडचण येणार नाही. महान खेळाडूंवर यामुळे कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे स्लेजिंगपासून ऑसी खेळाडूंनी दूरच रहावे. स्लेजिंगमुळे कोहलीला धावा काढण्यासाठी अतिरिक्त प्रेरणा मिळेल. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाब्दिक मारा करणे टाळलेलेच बरे.ह्ण
गेल्यावेळच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तत्कालिन कर्णधार टीम पेन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हीच चूक केली होती आणि भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत 2-1 असे नमवले होते.
Web Title: Steve Waugh gave valuable advice to the Kangaroos; Don’t sled against Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.