ठळक मुद्दे माझ्यामते कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा आपली चूक कबूल करत नव्हता, त्यामुळे स्मिथला ही आमची रणिनती होती, असे बोलावे लागले आहे.
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने ही आमची रणनिती होती. याबाबत संघातील खेळाडूंनी बैठक घेतली होती, असे स्मिथने म्हटले होते. पण असे काही घडले नसल्याची कबूली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईजेझ हेनरिक्सने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ही आमची रणनिती होती, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जाहीरही केले. चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.
चेंडूशी छेडछाड करणे, ही संघाची रणनिती नव्हती, असे स्पष्ट मत हेनरिक्सने व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, " चेंडूशी छेडछाड करायची, याबाबत संघातल्या खेळाडूंची चर्चा कधीच झाली नव्हती. हे जे काही स्मिथ बोलतो आहे, ते खोटे आहे. माझ्यामते कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा आपली चूक कबूल करत नव्हता, त्यामुळे स्मिथला असे बोलावे लागले आहे. त्याने याबाबत संघातील वरिष्ठ खेळाडूंबरोबर कोणताही बैठक घेतली नव्हती. "
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी काय
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.
Web Title: Steven Smith is liar; Henriques revealed some thigs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.