मँचेस्टर, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा भन्नाय फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात स्मिथने द्विशतक झळकावले आणि बऱ्याच विक्रमांना पाठिशी टाकले. आता तर स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. आता स्मिथच्यापुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन आहेत.
आतापर्यंतच्या तीन अॅशेस मालिकेतील सामन्यांमध्ये स्मिथने 147च्या पेक्षाही जास्त सरासरीने 589 धावा केल्या आहेत. विराटची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 53.14 एवढी आहे, तर स्मिथची 64.64 एवढी आहे. त्यामुळे सरासरीमध्ये तर कोहलीपेक्षा स्मिथ सरस असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रॅडमन यांची सरासरी 94.94 होती. त्यामुळे आता स्मिथपुढे फक्त ब्रॅडमन असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे काहींनी तर या युगाचा ब्रॅडमन, अशी स्तुतीसुमने स्मिथवर उधळायला सुरुवात केली आहे.
स्मिथने कोहलीपेक्षा कमी कसोटी सामने खेळले आहेत. स्मिथ आपला 67वा कसोटी सामना खेळत आहे, तर कोहलीने 79 सामने खेळले आहेत. स्मिथने 67 कसोटी सामन्यांमध्ये 6788 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 79 सामन्यांमध्ये 6749 धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी कोहलीपेक्षा स्मिथ सरस असल्याचेच दिसत आहे.
बेल्सविनाच सुरु राहीला सामना; पंचांच्या लक्षात येई ना?
काही वेळा बेल्स पडली नाही, म्हणून आऊट दिले जात नाही. पण एका सामन्यात चक्क बेल्स नसल्याचेच पाहायला मिळाले. या गोष्टीवरून बऱ्याच जणांनी पंचांना ट्रोल करायचा प्रयत्न केला. पण पंचांनी हा निर्णय नेमका का घेतला, हे त्यांनी जाणून घेतले नाही. नेमकं असं काय घडलं होतं की, पंचांना बेल्सशिवाय सामना खेळवावा लागला.
ही गोष्ट घडली अॅशेस मालिकेत. बुधवारी चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेल्सविना काही षटकांचा खेळ झाला. पण त्यावेळी पंच नेमके काय करत होते, त्यांच्या ही गोष्ट लक्षात कशी आली नाही, हे नियमांना धरून आहे का... असे बरेच प्रश्न आता तुम्हाला पडले असतील.
ही गोष्ट घडली सामन्याच्या 32 व्या षटकात. यावेळी जोरदार वारा वाहू लागला आणि बेल्स सतत पडायला लागल्या. त्यानंतर पंचांनी वजनांनी जड असलेल्या बेल्स आणण्यात आल्या. पण हवा एवढी जोरात वाहत होती की, त्या बेल्सही पडल्या. त्यानंतर मैदानावरील पंचांनी दोन्ही संघातील खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यानंतर बेल्सविना खेळ सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Web Title: Steven Smith's doubles century; Virat Kohli was left behind
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.