ठळक मुद्देपुन्हा एकदा मी क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. त्यासाठी सारे काही विसरून तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे.
सिडनी : मायदेशात परतल्यावर आपल्या कृत्याबद्दल देशवासियांची माफी मागताना स्टीव्हन स्मिथच्या अश्रूंचा बांध फुटला. आपल्या या कृत्याची जबाबदारीही स्मिथने यावेळी स्वीकारली आहे.
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.
या साऱ्या घटनेनंतर स्मिथ म्हणाला की, " क्रिकेटवर माझे मनापासून प्रम आहे. माझ्याकडून जी चूक घडली ती गंभीर स्वरुपाची आहे. एक कर्णधार म्हणून माझा हा निर्णय चुकलेला आहे. त्यामुळे देशासह क्रिकेटची प्रतिमाही मलिन झाली आहे. या साऱ्याबद्दल मी जाहीर माफी मागतो. या प्रकरणातून बोध घेऊन, यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची मी कबूली देतो. "
सिडनीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना स्मिथ म्हणाला की, " क्रिकेट हा जगातला सर्वोत्तम खेळ आहे. हा खेळ म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. त्यासाठी सारे काही विसरून तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे. "
Web Title: Steven Smith's tears broke; Ask forgiveness
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.