Join us  

स्टेनगनचे पुनरागमन, भारतासमोरील अडचणीत वाढ; दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाची निवड

भारतविरोधात पाच जानेवारीपासून होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दक्षिण फ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 6:40 PM

Open in App

केप टाऊन - भारतविरोधात पाच जानेवारीपासून होणाऱ्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दक्षिण फ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. फाफ डुप्लेसीस दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या 4 दिवसीय कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्याच दिवशी डावाने विजय मिळवला होता. या सामन्यात दुखापतग्रस्त डुप्लेसीसऐवजी एबी डिव्हीलिअर्सने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी डुप्लेसीस फिट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि क्विंटन टी कॉकला संघात स्थान देण्यात आल्याने भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. 

या दौऱ्यात भारत आणि आफ्रिका संघात तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -फाफ डुप्लेसीस (कर्णधार), हाशिम आमला, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), थिएनस डी ब्रुन, एबी डिव्हीलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडीन मार्क्रम, मॉर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरिस, अँडील फेलीक्वेयो, वर्नान फिलँडर, कगिसो रबाडा, डेल स्टेन. 

वेळापत्रक -

  • पहिली कसोटी : 5 ते 9 जानेवारी 2018 
  • दुसरी कसोटी : 13 ते 17 जानेवारी 2018
  • तिसरी कसोटी : 24 ते 28 जानेवारी 2018

वन डे मालिका

  • पहिला वन डे सामना : 1 फेब्रुवारी
  • दुसरा वन डे सामना : 4 फेब्रुवारी
  • तिसरा वन डे सामना : 7 फेब्रुवारी
  • चौथा वन डे सामना : 10 फेब्रुवारी
  • पाचवा वन डे सामना : 13 फेब्रुवारी
  • सहावा वन डे सामना : 16 फेब्रुवारी

टी ट्वेण्टी मालिका

  • पहिला टी 20 सामना : 18 फेब्रुवारी
  • दुसरा टी 20 सामना : 21 फेब्रुवारी
  • तिसरा टी 20 सामना : 24 फेब्रुवारी 

 

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका