भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सौरव गांगुलीपर्यंत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना बनावट इंजेक्शन देण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. हे खळबळजनक खुलासे अशा वेळी झाले आहेत जेव्हा भारतीय संघ १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी खेळणार आहे. त्याच दरम्यान उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची निवडही केली जाणार आहे.
'झी मीडिया'च्या स्टिंगमध्ये भारतीय क्रिकेटपटू तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन घेतात आणि कोणते इंजेक्शन डोपिंगमध्ये येत नाही हे त्यांना माहीत आहे, असे चेतन शर्मा म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते टीम इंडियाच्या अत्यंत गोपनीय गोष्टींवर बोलताना दिसत आहे. एवढेच नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी विश्रांतीचे कारण पुढे केले जात असल्याचेही समोर आले आहे. पाहुया असे कोणते १० गौप्यस्फोट आहेत ज्यांनी टीम इंडियाच्या पायाखालची जमीनही सरकवलीये.
खेळाडू पेन किलर घेतात
पेन किलर आणि बनावट इंजेक्शन्सबाबत ते म्हणाले- “नाही! मी इंजेक्शन बद्दल बोलत आहे. जर त्यांनी वेदनाशामक औषधे घेतली तर ते डोपिंगमध्ये येईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना अँटी-डोपिंगमध्ये कोणते इंजेक्शन येतात हे माहीत आहे.”
बुमराहचा फिटनेस
जसप्रीत बुमराहला वाकण्यात त्रास होत होत कारण त्याला गंभीर दुखापत झाली होतीय. याशिवाय एकदोन खेळाडू असे आहेत जे खासगीत इंजेक्शन्स घेतात. खेळण्यासाठी फीट आहे असं सांगून ते इंजेक्शन घेत असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
खोट्या फिटनेसवर खेळ
ते पुढे म्हणाले – खेळाडू तंदुरुस्त नाहीत, पण खेळण्यासाठी इंजेक्शन घेतात. ८० टक्के फिटनेस असतानाही ते खेळण्यास तयार आहेत. ते इंजेक्शन घेतात आणि खेळायला लागतात.
विराट विरुद्ध रोहित
विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा यावर ते म्हणताना दिसतात – विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात भांडण नाही, पण अहंकार आहे. दोघंही मोठ्या फिल्म स्टार्ससारखेच आहेत.
सौरभ गांगुलीला विराट आवडत नव्हता
बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले- गांगुली यांनी रोहितला पसंती दिली नाही, पण त्यांना विराट कधीच आवडला नाही. आपण अशाप्रकारे त्याकडे पाहू शकतो.
विराटला का हटवलं?
बीसीसीआयच्या अध्यक्षांमुळे कर्णधारपद गमवावे लागल्याचे विराट कोहलीला वाटत होते. निवड समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ९ लोक होते, गांगुली यांनी त्यांना एकदा विचार करायला सांगितले असेल. मला वाटते की कोहलीने ते ऐकले नाही, माझ्यासह इतर ९ लोक आणि इतर सर्व निवडकर्ते, बीसीसीआयचे अधिकारी होते. कोहलीने त्याचे ऐकले नसेल, असे चेतन शर्मा म्हणताना दिसतायत.
कोहली की गांगुली कोण खोटं बोलतंय?
कोहली आणि गँगलीवर चेतन शर्मा यांनी आणखी एक खुलासा केला - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने असा खुलासा केला की, कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेच्या दीड तास आधी त्याला सांगण्यात आले होते की, हे अनावश्यक आहे. केवळ सौरव गांगुली यांच्यावर पलटवार करायचा होता यासाठी त्यांनी असे केले.
कोहली, गांगुली यांच्यात अहंकार
सौरव गांगुली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान झालेल्या बैठकीत ही टिप्पणी केली. सर्व निवडक, बोर्डाचे अध्यक्ष आणि माझ्यासह सर्वजण उपस्थित होते. विराटने गांगुलीचे ऐकले की नाही हे स्पष्ट नाही, परंतु कोणत्याही प्रकारे ही त्याची आणि गांगुलीची वैयक्तिक बाब आहे. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषदेत हा विषय का काढला हे समजू शकलेले नाही. हा विषय संघाच्या चर्चेशी संबंधित नव्हता आणि विराटने तो का निवडला हे स्पष्ट नाही. खरेतर, ६ ते ९ लोकांमध्ये संभाषण झाले होते ज्यादरम्यान गांगुली यांनी हे सांगितले. असे दिसून येते की बोर्ड आणि खेळाडू यांच्यात वाद झाला होता, परंतु तो एक खाजगी प्रकरण होते जे अद्याप सुटलेला नाही, असे ते पुढे म्हणतात.
१०-१५ प्लेअर्सना आणलं
व्हिडीओमध्ये ते टीम इंडियाच्या भविष्याविषयी बोलताना दिसत आहे - मी सूर्यकुमार यादव, ईशान किशन, दीपक हुडा, शुभमन गिल आणि इतर १५-२० खेळाडूंना संघात आणले.
रोहितचं टी-२० करिअर संपलं
कर्णधारपदाबद्दल चेतन शर्मा म्हणाले, T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या मजबूत खेळाडूंना शुभमन गिल सारख्या खेळाडूंना संधी देण्यासाठी विश्रांती दिली जाते. हार्दिक पांड्या दीर्घकाळात कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि रोहित शर्मा यापुढे टी-२० संघाचा भाग असणार नाही, असेही ते म्हणताना दिसतायत.
Web Title: Sting Operation Fake Injection to Virat Vs saurav Ganguly Chetan Sharma s 10 claims that will move the ground under Team India's feet
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.