अफगाणिस्तानला नष्ट करणं थांबवा, रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय; राशिद खानचे वर्ल्ड लीडरला भावनिक आवाहन

Afghanistan Taliban : अमेरिकन लष्कर माघारी परतण्यास सुरूवात झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूनं केलं भावनिक आवाहन.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:42 AM2021-08-11T11:42:32+5:302021-08-11T11:47:21+5:30

whatsapp join usJoin us
Stop destroying Afghanistan innocent people are being killed every day cricketer Rashid Khans appeal world leader | अफगाणिस्तानला नष्ट करणं थांबवा, रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय; राशिद खानचे वर्ल्ड लीडरला भावनिक आवाहन

अफगाणिस्तानला नष्ट करणं थांबवा, रोज निष्पाप लोकांचा जीव जातोय; राशिद खानचे वर्ल्ड लीडरला भावनिक आवाहन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअमेरिकन लष्कर माघारी परतण्यास सुरूवात झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूनं केलं भावनिक आवाहन.

अफगाणिस्तानमध्ये लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. तालिबाननं अफगाणिस्तानच्या अनेक बाहेरील भागांमध्ये आपला ताबा मिळवला आहे. तसंच आता तालिबान अनेक प्रातांच्या राजधानींवर ताबा मिळवण्यासाठी पुढे जात आहेत. अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी तालिबान निरनिराळ्या भागांमध्ये हल्ले करत आहे. अमेरिकेचं लष्कर माघारी परतण्यास सुरूवात झाल्यानंतर आता स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील ही परिस्थिती पाहत अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान यानं जागतिक नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना आवाहन केलं आहे.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खाननं एक भावूक ट्वीट केलं आहे. "जगातील नेते मंडळी, माझा देश सध्या कठीण काळातून जात आहे. हजारो निष्पाप लोक ज्यात, मुलं, महिला आहेत त्यांचे जीव जात आहेत. अनेक कुटुंबांना आपलं घरही सोडावं लागलं. अनेक घरं, संपत्ती नष्ट करण्यात आल्या.या संकटात आम्हाला सोडून जाऊ नका असं तुम्हाला आवाहन आहे. अफगाणिस्तानमधील लोकांना मारणं बंद करा, आम्हाला शांतता हवी आहे," असं राशिद खान म्हणाला.


राशिद खाननं ट्वीटद्वारे अफगाणिस्तानमध्ये असलेली परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेनं आपल्या लष्कराला परत बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं पुन्हा पाय पसरण्यास सुरूवात केली. आतापर्यंत तालिबाननं अर्ध्या अफगाणिस्तानवर आणि ४०० जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानातील बहुतांश भागातील आपल्या सैनिकांना परत बोलावलं आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत अमेरिकेचे सर्वच सैनिक माघारी परतणार आहेत.

Web Title: Stop destroying Afghanistan innocent people are being killed every day cricketer Rashid Khans appeal world leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.