इस्लामाबाद - : क्रिकेटप्रेमींसाठी आता 10 षटकांचे सामने ही पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी चॅरिटी फाऊंडेशन तर्फे दहा षटकांचे सामने सुरु आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांच्या तुफानी फलंदाजीमुळे प्रेषकांना षटकार-चौकारांची आतिषबाजी पहायला मिळाली. दहा षटकाच्या सामन्यात सलग सहा षटकार आणि वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम यामध्ये करण्यात आला आहे.
एकाच षटकात सलग सहा षटकार पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने ठोकले. तर 26 चेंडूतच बाबर आजमने वेगवान शतक पूर्ण केलं आहे. एसएएफ रेड टीमकडून शोएब मलिक खेळत होता. 6 षटकांमध्ये 104 धावा झाल्या त्यावेळी शोएब मलिक तेव्हाच फलंदाजीसाठी आला आणि सलग सहा षटकार लगावले. मलिकच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर संघाने 10 षटकांमध्ये 210 धावांचा डोंगर उभा केला होता. 211 धावांच्या आव्हाना पाठलाग करण्यासाठी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एसएएफ ग्रीननेही दमदार फलंदाजी केली. बाबर आजमने तुफानी फलंदाजी करताना फक्त 26 चेंडूत शतक झळकावले. तर शाहिद आफ्रिदीने विजयी चौकार मारला.
यावेळी बाबर आजमने आपल्या तुफानी शतकामध्ये 11 षटकार आणि सात चौकारासह 384.26 च्या सरासरीनं खोऱ्यानं धावा काढल्यात. बाबर आजमला पाकिस्तानाचा प्रतिभाशाली फलंदाज म्हणून ओळखलं जात. गेल्या वर्षी पाकिस्तानचे कोच मिकी आर्थरनं बाबर आजमची तुलना भारताच्या विराट कोहलीशी केली होती. विराट कोहली जगातील अव्वल फलंदाज आहे. त्याच्यासोबत माझी तुलाना करणं चुकीचे असल्याचे बाबर अजमनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. आंतरष्ट्रीय सामन्यात बाबर आजमनं 36 वन-डे सामन्यात 58.60 च्या सरासरीनं 1758 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्यानं सात शतकं लगावली आहेत.