Join us  

ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा धडकले

क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग मंगळवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला तो संयुक्त अरब अमिराती या संघाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 6:54 PM

Open in App
ठळक मुद्देसंयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात 11 षटकारांची अतिषबाजी.

हरारे : ख्रिस गेल म्हणजे एक झंझावात. गेल या वादळापुढे क्रिकेटधमले जवळपास सारेच देश लोटांगण घालताना साऱ्यांनी पाहिले आहेत. गोलंदाजांचा कर्दनकाळ, अशीच गेलची ओळख क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग मंगळवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला तो संयुक्त अरब अमिराती या संघाला.

इंग्लंडमध्ये पुढल्या वर्षी क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडसह क्रमवारीतील अन्य सात देश पात्र ठरले आहेत. पण क्रमवारीतील त्यानंतरच्या देशांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. आतापर्यंत दोनदा विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या वेस्ट इंडिजवर या पात्रता फेरीत खेळण्याची नामुष्की ओढवली आहे.

अमिरातीविरुद्धच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच गेलचे वादळ मैदानात घोंगायला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा दुसरा सलामीवीर इव्हिन लुईसला जास्त फटकेबाजी करता आली नाही. पण त्याची कसर गेलने भरून काढली. अमिरातीच्या गोलंदाजांवर गेल सुरुवातीपासूनच तुटून पडला आणि अखेर त्या गोलंदाजांपुढे गेलपुढे नतमस्तक होण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही.

गेलने आपल्या या तुफानी खेळीमध्ये तब्बल 11 षटकारांची अतिषबाजी केली, तर सात  चौकारही लगावले. गेलने 91 चेंडूंमध्ये 123 धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला 50 षटकांमध्ये 357 धावांचा डोंगर उभारता आला.

गेलचे हे वनदे क्रिकेटमधील 23वे अर्धशतक ठरले. गेलने आतापर्यंत 276 वनडे सामन्यांमध्ये 85.97च्या स्ट्राइक रेटने 9543 धावा केल्या आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे, त्याचबरोबर आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत गेलने 23 शतके आणि 48 अर्धशतके लगावली आहेत.

 

टॅग्स :क्रिकेटवेस्ट इंडिज