- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व यांच्यामुळे झाला. विशेषत: शेवटच्या दोन सत्रांमध्ये भारताने इंग्लंडला जसे बाद केले तो त्यांच्यासाठी तर अपमानच होता.
भारतीय संघाने दाखवलेल्या धैर्यामुळे खुप काही झाले. जसप्रीत बुमराहने अँडरसनवर बाऊन्सर फेकले. मला वाटते की अकराव्या क्रमांकावरील फलंदाज हा या गोष्टींसाठी तयार नसतो. मात्र बुमराह आणि कोहली हे त्यामुळे गुन्हेगार ठरत नाहीत.
इंग्लंडचे खेळाडू देखील भारतीय खेळाडूंना नडत होते.त्यामुळे तणाव वाढत होता. शिवाय अँडरसनला फेकलेल्या ८ -१० बाऊन्सरच्या बदल्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जवळपास संपुर्ण सत्रचच भारताच्या तळाच्या फलंदाजांना तशीच गोलंदाजी केली. पण हेच त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटले. लॉर्ड्सवर विजय मिळवतांना भारताने गेल्या काही वर्षात अडचणीच्या ठरलेल्या गोष्टी दूर केल्या. त्यात सलामीची जोडी आणि सातत्याने संघाच्या विजयात योगदान देणारे गोलंदाज पुढे आलेत. कोहली कर्णधार झाल्यापासून भारताला त्याची कमतरता भासत होती. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारताला धक्के बसले. कोहली व शास्त्री यांनी आक्रमक रणनिती अवलंबली आणि पाच गोलंदाज खेळवले.
nभारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलही घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला.
nन्युझीलंड विरोधात डब्लुटीसी फायनलसह या दौऱ्यात मधल्या फळीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुजारा व रहाणे यांनी शतकी भागीदारी केली मात्र ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्मपासून दूर आहेत. ऋषभ पंतही अजून चमकलेला नाही.
nसर्वात निराश केले ते विराट कोहलीने. त्याने २०१८ मध्ये जवळपास ६०० धावा केल्या होत्या. त्यातुलनेत यंदाची कामगिरी खराब आहे. तो नेतृत्व उत्तम करतो. पण गोलंदाजांची मेहनत व मालिकेतील आघाडी वाया जाणार नाही हे मधल्या फळीला बघावे लागेल.
Web Title: The story of Lords victory, aggression, courage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.