भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने त्याच्या कार्यकाळात अनेक ट्रॉफी जिंकल्या आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताने 2 विश्वचषकही जिंकले आहेत. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्याने सर्वांनाच धोनीची आठवण येत आहे.
अशा अनेक बातम्या आल्या आहेत, की महेंद्र सिंह धोनी छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा मेंटर म्हणून काम करू शकतो. ही बातमी पसल्यानंतर, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बटनेही धोनी संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, धोनी पुन्हा भारतीय संघाशी जोडला गेल्यास संघासाठी काय-काय फायदे होऊ शकता, हे त्याने सांगितले आहे.
सलमान बटने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले आहे की, ”धोनी आल्यास भारतीय संघाला मोठा फायदा होईल. तो ज्या पद्धतीचा कर्णधार राहिला आहे, त्याचे प्लॅनिंग आणि त्याचा उत्तम स्वभाव संघासाठी शस्त्राप्रमाणे कामी येईल”. तसेच, "खेळाडूंना त्याचा खूप फायदा होईल. भारतीय क्रिकेट फार पुढे जाईल. आपण अनुभवाचा पराभव करू शकत नाही”, असेही बटने म्हटले आहे.
धोनीने भारताला जिंकूण दिल्या आहेत आयसीसी ट्रॉफी - जागतिक क्रिकेटमध्ये धोनी हा एकमेव कर्णधार आहे. ज्याने ICC च्या तिन्ही मर्यादित षटकांमध्ये ट्रॉफी जिंकल्या आहेत. गेल्या वर्षी त्याला टी-२० मेंटॉर म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. महेंद्रसिंह धोनीने 2013 मध्ये शेवटची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारताला आजपर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकला आहे.