Jasprit Bumrah, IND vs SA T20 Series: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. स्ट्रेच फॅक्चर ( पाठीच्या दुखापतीमुळे) त्याने माघार घेतल्याचे वृत्त PTI ने दिले आणि एकच खळबळ उडाली. आता बुमराहच्या जागी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी व दीपक चहर यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांनाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहे. पण, मुख्य संघात बुमराहची रिप्लेसमेंट कोण करेल याची उत्सुकता आहे. त्यात भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wassim Jaffer) याने जसप्रीतच्या दुखापतीबाबत केलेल्या विधानानं भुवया उंचावल्या आहेत.
जसप्रीत बुमराहला दुखापत अन् BCCI ने मोहम्मद शमीबाबत घेतला निर्णय; त्यानंतर होईल वर्ल्ड कपचा निर्णय
इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीतची दुखापत बळावली आणि त्याने वेस्ट इंडिज दौरा व आशिया चषक २०२२ स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर जसप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. त्यात आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळला नाही. सराव सत्रात त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढण्याचे कर्णधार रोहितने सांगितले. पण, आज BCCI ने त्याने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्याच्या जागी मोहम्मद सिराजची या मालिकेसाठी निवड झाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी
वसीम जाफरचं विधानभारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानं जसप्रीतच्या दुखापतीबाबत मोठं विधान केलं. तो म्हणाला, कदाचित जसप्रीतला स्ट्रेच फॅक्चर आधीच झालं असावं. दोन मॅच खेळल्यामुळे त्यावरील प्रेशर वाढलं आणि ती दुखापत अधिक बळावली. त्याच्या पुनरागमनाची घाई केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं. तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहिला असता. त्याची दुखापती किती गंभीर आहे, याची कल्पना नाही. पण, त्याला अधिक काळ विश्रांती मिळायला हवी होती.''
स्ट्रेस फॅक्चर म्हणजे काय?जसप्रीत बुमराहने स्ट्रेस फॅक्चरमुळे माघार घेतली. तुम्ही शरीराच्या एका भागावर जास्त ताण देता तेव्हा स्नायू किंवा हाडांना दुखापत होऊ शकते किंवा छोटं फ्रॅक्चर होऊ शकतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"