जोहान्सबर्ग : भारतीय क्रिकेट संघाने येथे सुरू होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आज वॉन्डरर्स येथे सराव केला. हा सराव चार तासांच्या आत संपला.
भारताने केपटाऊन येथे पहिली कसोटी ७२ धावांनी गमावली होती आणि सेंच्युरियनमध्ये दुस-या कसोटीत १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसºया कसोटीतील पराभवानंतर खेळाडूंनी तीन दिवसांच्या ब्रेकचा आनंद घेतला आणि त्यांनी जोहान्सबर्ग व त्याच्याजवळील स्थळांची सफारी केली व थीम पार्क येथेही ते फिरायला गेले.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन कसोटी संघ म्हणून मालिकेचा अखेर सन्मानाने करण्याच्या मोहिमेअंतर्गत त्यांनी आज नेटवर चांगलाच घाम गाळला. भारतीय कर्णधार विराट कोहली सरावादरम्यान खेळाडू आणि स्थानिक नेटमध्ये गोलंदाजांशी चर्चा करताना आढळला. फुटबॉलच्या वॉर्मअप सामन्यानंतर खेळाडूंनी आपापल्या खेळावर मेहनत घेणे सुरू केले. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर याने खेळाडूंकडून गांभीर्याने सराव करून घेतला. त्यात पार्थिव पटेल, के. एल. राहुल आणि अजिंक्य रहाणे स्लिपमध्ये होते. त्यानंतर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकदेखील या त्रिकुटांसोबत फलंदाजीचा सराव करू लागले. दक्षिण आफ्रिकेत नुकतेच दाखल झालेले शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर राहुल, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी फलंदाजीचा सराव केला.
नेटमध्ये वेगवान गोलंदाज, थ्रो डाऊन आणि स्पिनरविरुद्ध सरावाची व्यवस्था करण्यात आली. विजय आणि राहुल यांनी सुरुवातीला फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि सरावादरम्यान मोठे फटकेदेखील मारले. विजयने रवींद्र जडेजाचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावला. आर. आश्विननेदेखील याच नेटमध्ये गोलंदाजी केली. यादरम्यान राहुलच्या गुडघ्यावर चेंडू आदळला. त्यानंतर त्याच्या गुडघ्याला आईसपॅक लावण्यात आला. तथापि, त्याने पुन्हा फलंदाजी सुरू केली आणि सर्व चिंतांना दूर केले. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पहिल्या दोन कसोटीत अंतिम संघाबाहेर राहणाºया अजिंक्य रहाणे याने नंतर फलंदाजी केली. त्याने कोहली आणि हार्दिक पंड्यासोबत फलंदाजी केली, जो की आगामी तिसºया कसोटीतील मधल्या फळीतील क्रम असू शकतो.
भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमी यांनी नवीन कुकाबुरा चेंडूने गोलंदाजी केली. या दोघांनी आश्विन आणि जसप्रीत बुमराहसोबत नेटमध्ये फलंदाजीदेखील केली. सरावाच्या सत्रादरम्यान ईशांत शर्मा आणि उमेश यादवदेखील वेगवान गोलंदाजी करीत होते. तीन दिवसांआधी येथे सामन्यासाठी खेळपट्टी बनवणे कठीण वाटत होते; परंतु आज खेळपट्टीवरील बरेच गवत काढण्यात आले. तरीदेखील त्यावर बरेच गवत आहे.
वॉन्डरर्सचे मुख्य क्युरेटर बेथुएल बुथेलेजी यांनी सांगितले की, ‘मी यावर खूप गवत सोडले आहे आणि सामन्याआधी मी ते कापणार नाही. आम्ही सामन्याआधी त्यावर पाणी टाकू. सेंच्युरियनप्रमाणे येथेही गवत सुकणार नाही. कारण मैदानावर खूप पाणी आहे.’
Web Title: Struggling to save reputation, India started practice for the third Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.