Stuart Broad, AUS vs ENG : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतील विराट कोहली vs DRS हे प्रकरण ताजे असताना अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉड असेच काहीसे वागला. होबार्ट येथे सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज चेंडू टाकण्याआधी अचानक थांबला आणि यष्टिरक्षकाच्या दिशेनं बघून 'रोबोट सारखं हलणं थांबव' असं म्हणत संतापला. ब्रॉड नक्की कोणावर संतापला याचा उलगडा नंतर झाला.
मिचेल स्टार्क स्ट्राईकवर होता अन् ब्रॉडनं गोलंदाजीसाठी रनअप घेतलं, परंतु तो अचानक नॉन स्ट्राईकच्या येथील स्टम्प जवळ येऊन थांबला. यष्टिरक्षकाच्या मागे हलणाऱ्या कॅमेरा कारमुळे तो संतापला अन् त्यानं राग व्यक्त केला.
या सामन्यात समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट यानं ब्रॉडला लहान मुलगा असल्याचे संबोधले.''हे लहान मुलासारखे वागणे झाले. या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.''
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३०३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव १८८ धावांवर गडगडला. ट्रॅव्हीस हेड ( १०१) याचे शतक, कॅमेरून ग्रीन ( ७४) व नॅथन लियॉन ( ३१) यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ३ बाद १२ धावांवरून मोठी मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंड काहीच करू शकला नाही. पॅट कमिन्सनं ४, तर मिचेल स्टार्कनं ३ विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स ( ३६) व जो रुट ( ३४) हे इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. म
दोन दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानंही DRS चा निर्णय आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरच्या बाजूनं लागल्यानंतर असाच संताप व्यक्त केला होता.