ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधील 400 बळी पूर्ण केले. क्रिकेट विश्वात 400 बळी मिळवणारा ब्रॉड हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
सर्वात कमी वयामध्ये 400 बळी मिळवणारे गोलंदाजखेळाडू वय प्रतिस्पर्धी वर्षस्टुअर्ट ब्रॉड 31 वर्षे 271 दिवस न्यूझीलंड 2018डेल स्टेन 32 वर्षे 33 दिवस बांगलादेश 2015ग्लेन मॅग्रा 32 वर्षे 252 दिवस पाकिस्तान 2002जेम्स अँडरसन 32 वर्षे 303 दिवस न्यूझीलंड 2015कपिल देव 33 वर्षे 26 दिवस ऑस्ट्रेलिया 1992
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत ब्रॉडने हा विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडकडून 400 बळी मिळणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी जेम्स अँडरसनने 400 बळी मिळवले आहेत. ब्रॉडने 2007 साली कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या 115व्या सामन्यात त्याने चारशे बळींचा टप्पा गाठला आहे. क्रिकेट विश्वात यापूर्वी 14 गोलंदाजांनी 400पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. यामध्ये पाच फिरकीपटूंचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 400पेक्षा जास्त धावा मिळवणारे गोलंदाजखेळाडू सामने बळीमुथय्या मुरलीधरन 133 800शेन वार्न 145 708अनिल कुंबळे 132 619ग्लेन मॅग्रा 124 563जेम्स अँडरसन 135* 525कर्टनी वॉल्श 132 519कपिल देव 131 434सर रीचर्ड हॅडली 86 431शॉन पोलॉक 108 421डेल स्टेन 86 419हरभजन सिंग 103 417रंगना हेराथ 89 415वसीम अक्रम 104 414कर्टली अॅम्ब्रोज 98 405स्टुअर्ट ब्रॉड 115* 400