मुंबई - इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दुस-या कसोटीत भारतीय फलंदाजांना हैराण केले. त्याने कर्णधार विराट कोहलीसह भारताच्या चार प्रमुख फलंदाजांना बाद करताना इंग्लंडला एक डाव आणि 159 धावांनी विजय मिळवून दिला. त्याने 2.75च्या सरासरीने 44 धावांत भारताचे चार फलंदाज बाद केले. या सामन्यात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा पराक्रम 32 वर्षीय ब्रॉडने केला. ब्रॉडचा हा आक्रमकपणा पाहून भारतीय खेळाडू चांगलेच दचकले. तो अक्षरशः रागानेच गोलंदाजी करत होता, परंतु त्याचा हा राग प्रेयसीशी झालेल्या 'ब्रेक-अप'वरचा होता.
( India vs England 2nd Test: अँडरसन - ब्रॉडचा भेदक मारा, लॉर्ड्स कसोटीत भारताचा दारुण पराभव)
व्यग्र वेळापत्रकामुळे ब्रॉड आणि त्याची प्रेयसी मॉली किंग हे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला. ब्रॉड आणि किंग यांचे प्रेम पाच महिनेच टिकले. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. हा प्रसंग बरोबर लॉर्ड्स कसोटी सुरू होण्यापूर्वीच घडला आणि त्याच सर्व राग ब्रॉडने भारतीय फलंदाजांवर काढला. त्या रागात ब्रॉडने सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. भारताच्या चेतेश्वर पुजाराला या रागाचा चांगलाच अनुभव आला. पाहा कसा..
( India vs England Test: म्हणून आम्ही हरलो, विराट कोहलीचा मोठा खुलासा)लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या सर्वच गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. अवघ्या 494 चेंडूंत त्यांनी भारताचा दोन्ही डाव गुंडाळला. या उलट इंग्लंडने 529 चेंडूंचा सामना करून 7 बाद 396 धावा केल्या. भारताला दोन्हा डावांत मिळून 237 धावा करता आल्या. ब्रॉडने सरासरी तासाला 135.80 किलोमीटरच्या वेगाने चेंडू टाकला आणि या सामन्यातील कोणत्याही गोलंदाजाच्या तुलनेत हा वेगवान मारा ठरला. स्विंग आणि सिमच्या बाबतितही ब्रॉडचे वर्चस्व राहिले. पुजारा ज्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला तो 3.8 अंश कोनातून ब्रॉडने वळवला होता आणि या सामन्यातील तो सर्वात वळलेला चेंडू ठरला.