Join us

Really Big Family : स्टुअर्ट ब्रॉडच्या होणाऱ्या नवरीचं स्वप्न; गृहप्रवेश करण्यापूर्वीच जाहीर केली बकेट लिस्ट!

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) याच्या होणाऱ्या पत्नीनं गृहप्रवेश करण्यापूर्वी मागण्यांचा भडीमार केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 17:43 IST

Open in App

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) याच्या होणाऱ्या पत्नीनं गृहप्रवेश करण्यापूर्वी मागण्यांचा भडीमार केला आहे. मॉली किंग ( Mollie King) असे तिचे नाव असून ती ब्रिटीश सिंगर आहे. मॉलीला खूप मोठं कुटुंब हवं आहे आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी तिनं स्टुअर्ट ब्रॉडच्या कानात आतापासून गुणगुण करायला सुरुवात केली आहे. ब्रिटीश सिंगर मॉली किंग आणि इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी याचवर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला. या दोघांनी सोशल मीडियावर फोटोही पोस्ट केले होते आणि 2021ची यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नाही, असं लिहिलं होतं.

2012पासून ही दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2018मध्ये या दोघांचं नातं तुटल्याच्या चर्चा आल्या होत्या, परंतु या दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. मॉलीनं फिमेल फर्स्ट मॅगझीनशी बोलताना सांगितले की,''मला कुटुंब हवंय. मला हवं तसंच हे कुटुंब आहे. मला रॉयल साईज बिग फॅमिली हवीय. ज्यांच्यावर मी भविष्यात भरपूर प्रेम करू शकेन. कुटुंबीयांच्या प्रेमात राहणे, हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे. स्टुअर्ट माझ्या आयुष्यात आल्यानं मी स्वतःला नशिबवान समजते.''

ब्रॉड जेव्हा क्रिकेट दौऱ्यावर असतो, तेव्हा घरात एकटं वाटतं. दोघांना एकमेकांना अधिक वेळ देता येत नसल्याचेही तिनं सांगितलं. ब्रॉड सध्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत आहे. 2 जूनपासून या मालिकेला सुरवात होणार आहे आणि त्यानंतर 4 ऑगस्टपासून भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. ब्रॉडनं 146 कसोटीत 517, 121 वन डे त 178 आणि 56 ट्वेंटी-20त 65 विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :स्टुअर्ट ब्रॉडइंग्लंड