बाबो; ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टुअर्ट मॅकगिलला किडनॅप करणारा निघाला गर्लफ्रेंडचा भाऊ अन्...

ऑस्ट्रेलियचा माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल ( Stuart MacGill) याचे मागील महिन्यात घराजवळून गनपॉइंटवर अपहरण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:49 AM2021-05-08T11:49:27+5:302021-05-08T11:54:46+5:30

whatsapp join usJoin us
Stuart MacGill's girlfriend's brother allegedly part of his kidnapping | बाबो; ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टुअर्ट मॅकगिलला किडनॅप करणारा निघाला गर्लफ्रेंडचा भाऊ अन्...

बाबो; ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टुअर्ट मॅकगिलला किडनॅप करणारा निघाला गर्लफ्रेंडचा भाऊ अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियचा माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल ( Stuart MacGill) याचे मागील महिन्यात घराजवळून गनपॉइंटवर अपहरण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. पोलिसांनी यासंबंधित काही लोकांना अटक केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळीनं मॅकगिल याचे अपहरण केले होते.  या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये एक व्यक्ती हा मॅकगिल याची गर्लफ्रेंड मारिया ओ'मीघर ( Maria O' Meagher) हिचा भाऊ निघाला. पण, मारियानं या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसून भावाशी संबंध कधीच तोडल्याचे सांगितले. ३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!

मॅकगिल याचा ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्यानं १९९८ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या कारकिर्दीत तो अनेकदा शेन वॉर्नच्या कामगिरीमागेच झाकोळला गेला. त्यामुळे वॉर्नसारखी प्रसिद्धी त्याला मिळू शकली नाही. त्यानं ४४ कसोटींत २०८ विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लेग स्पिनर्समध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्सचे प्रतिनिधित्व करताना त्यानं ३२८ विकेट्स घेतल्या आहेत. २००८मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले' 


 
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार १४ एप्रिलला मॅकगिल त्याच्या घराजवळील क्रेमोर्न येथील वाइन स्ट्रीटवर जात होते. तेव्हा त्याच्यानजीक एक ४६वर्षीय व्यक्ती आली आणि त्याच्याशी बोलू लागली. काही वेळआनंतर तिथे दोन माणसं आली आणि त्यांनी जबरदस्तीनं मॅकगिलला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करू लागले. तेथून त्याला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आणि मारहाण केली. त्यानंतर धमकी दिली गेली. एका तासानंतर बेलमोर येथे त्याला सोडण्यात आले. त्याला गंभीर जखमा झाल्या नाही, परंतु एका आठवड्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक करम्यात आली आहे. 

मारिया काय म्हणाली?
स्टुअर्ट आणि मी अजूनही एकत्र आहोत. आम्ही अजूनही भयभीत आहोत. मला इथे सुरक्षित वाटत नाही आणि नेमकं काय घडलं हेच कळत नाही. मी आणि माझा भाऊ दोघंही परस्परविरोधी आयुष्य जगतो. आम्ही भावंड असलो तरी आमच्यात जवळीक नाही. स्टुअर्ट आणि माझे कुटूंब अशा दुहेरी कात्रीत मी अडकली आहे. माझ्या कुटुंबीयांसाठीही हा मोठा धक्का आहे.'' 

Web Title: Stuart MacGill's girlfriend's brother allegedly part of his kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.