बंगळुरू - बंगळुरू येथे होणा-या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू आहे. 28 सप्टेंबरला होणा-या या सामन्यात भारतीय संघ विजयी आघाडी 4-0 करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाचा विजयरथ पुढे नेण्यासाठी संघाचा जलदगती गोलंदाज आणि यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रित बुमराह देखील खास तयारी करत आहे.
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुमराह सराव करत असतानाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बुमराहने पहिल्या बॉलवर ऑफ स्टंप उडवला, त्याच्यानंतर लेग स्टंप टारगेट केला आणि नंतर मिडल आणि लेग स्टंप दोन्ही एकत्र उडवले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने तिस-या वनडेमध्ये भारताकडून सणसणीत पराभव झाल्यानंतर जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमारवर स्तुतीसुमने उधळली होती. या सामन्याबद्दल बोलताना स्मिथनं बुमराह व भुवनेश्वर हे सर्वोत्कृष्ट डेथ बोलर्स आहेत असं कौतुक केलं होतं. मला वाटतं, शेवटच्या महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारे बुमराह व भुवनेश्वर कुमार सध्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. विशेषत: विकेट जर मंदावत असेल तर या दोघांना खेळणं अवघड असतं," असे उद्गार स्मिथने काढले होते.
पाहा व्हिडीओ -