Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला होता, परंतु हरमनप्रीत कौरच्या झेलसमोर तो फिका ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 10:34 AM2018-12-15T10:34:11+5:302018-12-15T10:35:01+5:30

whatsapp join usJoin us
Stunning Catch by Harmanpreet Kaur | Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका

Stunning Catch : हरमनप्रीत कौरच्या चपळतेसमोर विराट कोहलीचा झेल फिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय महिला संघाच्या कर्णधाराचा अप्रतिम झेलमहिला बिग बॅश लीगमध्ये हरमनप्रीत कौरची कमालसोशल मीडियावर झेल व्हायरल

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा झेल उडाला.  कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला.  मात्र, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतच्या चपळतेसमोर कोहलीचा तो झेल फिका ठरला आहे. हरमनप्रीतने शनिवारी महिला बिग बॅश लीगच्या सामन्यात Stunning Catch घेतला आणि सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

अॅडलेड स्ट्रायकर आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामन्यात हरमनप्रीतचा झेल चर्चेचा विषय ठरला आहे. हरमनप्रीत सिडनी थंडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकरने 20 षटकांत 132 धावा चोपून काढल्या. सुझी बॅट्सने नाबाद 79 धावांची खेळी करून संघाला मोठी मजल मारून दिली. मात्र, या सामन्याचा तिसऱ्या षटकात हरमनप्रीतने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरत आहे. ताहलिया मॅक्ग्राथने टोलावलेला चेंडू मिड ऑफला उभ्या असलेल्या हरमनप्रीतने सुरेख पद्धतीने टिपला. 
पाहा हा व्हिडीओ... 



भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण दुसऱ्या सत्रात भारताने तीन विकेट्स मिळवत सामन्यात पुनरागमन केले. चहापानानंतर खेळ सुरु झाला आणि काही मिनिटांमध्येच भारताला यश मिळाले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा झेल उडाला. हा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या दिशेने जात होता. कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला. हा झेल आता 'स्पाइडरमॅन कॅच' नावाने व्हायरल झाला होता. 

Web Title: Stunning Catch by Harmanpreet Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.