India vs England, 1st ODI : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे रिकाम्या स्टेडियमवर खेळाडूंना खेळावं लागत आहे. अशातही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते स्टेडियमबाहेर उभे राहून किंवा स्टेडियमशेजारील इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिअर करताना दिसत आहेत. पण, टीम इंडियाचा जबरा फॅन सुधीर कुमार चौधरी ( Sudhir Kumar Chaudhary) हा विराट कोहली ( Virat Kohli) अँड कंपनीला चिअर करण्यासाठी टेकडीवर जाऊन बसला. टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार?
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेचे सामने सुरू आहेत. तिथून जवळपास अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या वाघजाई मंदिराच्या टेकडीवर सुधीर कुमार चौधरी जाऊन बसला आणि तिथून तो टीम इंडियाला चिअर करत होता. मुळचा बिहारचा असलेला सुधीर हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा जबरदस्त फॅन आहे. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तो शरीरावर तिरंग्याचा रंग लावतो आणि तेंडुलकर असे लिहून हातात तिरंगा व शंख घेऊन मैदानावर उपस्थित असतो.
Team India Won the 1st ODI match against England. With out Audience
Posted by Sudhir Kumar Chaudhary on Tuesday, March 23, 2021
शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यानं ट्वेंटी-20 मालिकेपाठोपाठ वन डेतही आपली धमक दाखवली आणि इंग्लंडची पळता भूई करून सोडली. इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गुंडाळून भारतानं हा सामना ६६ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आाला. प्रसिद्ध कृष्णानं ५४ धावांत ४ विकेट्स घेतल्या, शार्दूलनं तीन, तर भुवीनं दोन विकेट्स घेतल्या. मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स