IPL 2023: अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत आपल्या टीमला प्रोत्साहन दिले. त्याच्यासह त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी देखील उपस्थित होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 03:06 PM2023-04-07T15:06:47+5:302023-04-07T15:07:13+5:30

whatsapp join usJoin us
Suhana Khan was happy to see Shardul Thakur's innings. She has reacted to Shardul's innings after the match. | IPL 2023: अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली...

IPL 2023: अप्रतिम! पालघरच्या पोराची खेळी बघून फिदा झाली शाहरुखची लेक, मॅच संपल्यानंतर म्हणाली...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) नाट्यमय ठरलेल्या लढतीत तब्बल ८१ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना खेचून आणला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने अडखळत्या सुरुवातीनंतरही २० षटकांत ७ बाद २०४ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी आरसीबीला १७.४ षटकांमध्ये केवळ १२३ धावांत गुंडाळले.

शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात सुनील नरेनने कोहलीला बाद केले आणि यानंतर आरसीबीच्या फलंदाजीला गळती लागली. आरसीबीकडून कोणालाही खेळपट्टीवर फारवेळ तग धरता आला नाही.

शार्दूल, शाहरुख सोडा, सामना पाहायला आलेल्या 'या' तरुणीची रंगली चर्चा; तुम्ही ओळखलं ना?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत आपल्या टीमला प्रोत्साहन दिले. त्याच्यासह त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी देखील उपस्थित होती. यावेळी शार्दूलची आक्रमक खेळी पाहून सुहाना खान खूश झाली. सामना संपल्यानंतर सुहान खाने शार्दूलच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. सुहाना म्हणाली की, मला क्रिकेट बघायला फारसं आवडत नाही. पण ही खेळी पाहिल्यानंतर मला वाटले की हा किती अप्रतिम खेळ आहे. अशी फलंदाजी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. शार्दूल चांगला खेळला, मला आनंद झाला की मला या ऐतिहासिक सामन्याचा आणि शार्दूलच्या शानदार खेळीचा साक्षीदार होता आला. शार्दूलने करोडो लोकांना चाहते बनवले आहे, त्यात माझाही समावेश आहे, असं सुहाना खान हिने सांगितले. 

दरम्यान, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर रहमानुल्लाहने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याच्यामुळे काहीसे पुनरागमन केलेल्या कोलकाताला शार्दुलने भक्कम स्थितीत आणताना स्फोटक अर्धशतक झळकावले. त्यामुळे एकवेळ १४० धावाही कठीण दिसत असलेल्या कोलकाताने द्विशतक झळकावले. कोलकाताने अर्धा संघ ८९ धावांत गमावला होता. गुरबाझने रिंकू सिंगसोबत ३१ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केल्यानंतर शार्दुलने रिंकूसोबत सहाव्या गड्यासाठी ४७ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी केली. शार्दूलने अवघ्या २० चेंडूत आयपीएलमधील पहिलेच वैयक्तिक अर्धशतक झळकवले.

Web Title: Suhana Khan was happy to see Shardul Thakur's innings. She has reacted to Shardul's innings after the match.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.